सांताक्रूझमधील घटनामुंबई : वीजेचा शॉक लागल्याने एका दाम्पत्याचा मृत्यू झाल्याची घटना सांताक्रुझ येथे शनिवारी सकाळी आठ वाजता घडली़ येथील गजाधरबंदच्या गजधर रोडवरील कल्पना डेअरीमागे हे दाम्पत्य राहत होते़ अनिल खैरे (४९) आणि वासंती खैरे (४०) अशी या मृत दाम्पत्याची नावे आहेत. सकाळी वासंती या घराच्या ग्रीलवर कपडे वाळत घालण्यासाठी गेल्या होत्या़ तेथे अचानक शॉक सर्किट झाला व वासंती जोरात ओरडल्या़ तेव्हा आवाज एकून पती अनिल हे धावून आले त्यांनी पत्नीला वाचविण्याचा प्रयत्न केला. मात्र त्याचेवळी या दोघांनाही वीजेचा झटका बसला व त्यातच त्यांचा मृत्यू झाला़हा प्रकार कळताच पोलिसांनी घटनास्थळी भेट दिली़ वीजेचा पुरवठा करणाऱ्या रिलायन्स कंपनीचे अधिकारीही तेथे आले व त्यांनी घटनास्थळाचा आढावा घेतला़ याचा अहवाल आल्यानंतर आता याची रितसर चौकशी होणार असून त्यात यासाठी दोषी आढळणाऱ्यांवर कारवाई केली जाणार आहे़ अद्याप याप्रकरणी गुन्हा नोंदवण्यात आलेला नाही़ (प्रतिनिधी)
कपडे वाळवताना ग्रीलचा शॉक लागून दाम्पत्याचा मृत्यू
By admin | Updated: December 28, 2014 02:22 IST