Join us

वडाळ्यात विजेचा शॉक लागून मुलाचा मृत्यू

By admin | Updated: March 18, 2016 01:34 IST

वडाळा येथे केबल टाकत असताना विजेचा धक्का बसून सात दिवसांपूर्वी गंभीररीत्या जखमी झालेल्या राहुल वैराट (१७) याचा बुधवारी उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्यामुळे संतापलेल्या

मुंबई : वडाळा येथे केबल टाकत असताना विजेचा धक्का बसून सात दिवसांपूर्वी गंभीररीत्या जखमी झालेल्या राहुल वैराट (१७) याचा बुधवारी उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्यामुळे संतापलेल्या रहिवाशांनी या घटनेला जबाबदार असलेल्या लोकांवर कडक कारवाईच्या मागणीसाठी आज वडाळा पोलीस ठाण्याला घेराव घातला. राहुल कोरबा मिठागर परिसरात राहत होता. तेथील केबल चालकाकडे काम करणारा हा मुलगा शुक्रवारी सायंकाळी बीपीटी कॉलनी परिसरातील एका इमारतीवर केबल टाकत होता. मात्र या इमारतीला लागूनच हाय व्होल्टेजच्या वायर जात असल्याने त्याला या वायरचा स्पर्श होऊन तो गंभीर जखमी झाला. ६० टक्के भाजल्याने त्याला रहिवाशांनी जे.जे. रुग्णालयात दाखल केले होते. त्याच्या मृत्यूची बातमीरहिवाशांना समजताच त्यांनी संबंधित इसमावर गुन्हा दाखल करण्याची मागणी वडाळा पोलिसांकडे केली. मात्र पोलिसांनी केवळ अपघाती घटनेची नोंद केल्याने रहिवाशांनी पोलीस ठाण्याला घेराव घालत मुख्य रस्ता बंद केला. अखेर पोलिसांनी गुन्हा दाखल करण्याचे आश्वासन दिल्यानंतर रहिवाशांनी माघार घेतली. (प्रतिनिधी)