Join us

खारघरमधील लिटिल वर्ल्ड मॉलजवळ कारच्या धडकेत वरळीतील २ वर्षांच्या मुलाचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 25, 2017 06:06 IST

पनवेल : खारघरमधील लिटिल वर्ल्ड मॉलजवळ शनिवारी रात्री झालेल्या अपघातात शौर्य गोडसे (२) या चिमुकल्याचा मृत्यू झाल्याची घटना घडली.

पनवेल : खारघरमधील लिटिल वर्ल्ड मॉलजवळ शनिवारी रात्री झालेल्या अपघातात शौर्य गोडसे (२) या चिमुकल्याचा मृत्यू झाल्याची घटना घडली. खारघर पोलिसांनी या अपघाताला जबाबदार असलेल्या कारचालक आशिष प्रकाश कुमार (२०) या तरुणाला अटक केली आहे. शौर्य वरळी येथील पोलीस वसाहतीत राहत होता. शनिवारी भाऊबीज असल्याने कामोठे येथे राहणा-या संग्राम जगताप या मामाकडे आईसह आला होता. सायंकाळी संग्राम भाचा शौर्यला घेऊन खारघरमधील लिटिल वर्ल्ड मॉलमध्ये गेला होता. रात्री १० वाजण्याच्या सुमारास मॉलच्या बाहेर पडताना, भरधाव वेगात आलेल्या कारचालकाने शौर्यला धडक दिली.