Join us  

वैद्यकीय पदवी प्रवेशाच्या मूळ कागदपत्र पडताळणीची मुदत वाढविली; नोंदणी न केलेल्या विद्यार्थ्यांनाही आणखी एक संधी

By ऑनलाइन लोकमत | Published: July 05, 2019 4:09 AM

वैद्यकीय अभ्यासक्रमाला प्रवेश घेऊ इच्छिणा-या विद्यार्थ्यांची मूळ कागदपत्र पडताळणी प्रक्रिया २९ जूनपासून सुरू झाली असून तिची मुदत ४ जुलै २०१९ पर्यंत होती.

मुंबई : एमबीबीएस, बीडीएस, बीएएमएस, बीएचएमएस अशा वैद्यकीय अभ्यासक्रमांच्या विविध विद्याशाखांमध्ये प्रथम वर्ष पदवी अभ्यासक्रमास २०१९-२० करिता प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या ‘नीट’ परीक्षा उत्तीर्ण विद्यार्थ्यांच्या मूळ कागदपत्र पडताळणी प्रक्रियेची मुदत आणखी एका दिवसाने वाढविण्यात आली आहे. आता विद्यार्थी राज्यातील संबंधित केंद्रांवर ५ जुलै २०१९ पर्यंत मूळ कागदपत्र पडताळणी करून घेऊ शकणार असल्याची माहिती सीईटी सेलने दिली आहे.वैद्यकीय अभ्यासक्रमाला प्रवेश घेऊ इच्छिणा-या विद्यार्थ्यांची मूळ कागदपत्र पडताळणी प्रक्रिया २९ जूनपासून सुरू झाली असून तिची मुदत ४ जुलै २०१९ पर्यंत होती. मात्र महाराष्ट्रात काही ठिकाणी या कालावधीत अतिवृष्टी झाल्यामुळे मूळ प्रमाणपत्र पडताळणी दिवशी केंद्रांवर उमेदवार पोहोचू शकले नाहीत. तसेच काही उमेदवारांनी मूळ प्रमाणपत्रे काही कारणास्तव त्यांच्या प्रमाणपत्र पडताळणी प्रक्रियेच्या दिवशी सादर केली नाहीत. अशा उमेदवारांना सीईटी सेलने आणखी एक संधी दिली असून आता ते मूळ प्रमाणपत्रे पडताळणी (रहिवासी प्रमाणपत्रे, जात प्रमाणपत्रे, नॉन क्रिमीलेअर) करून घेऊ शकतील.ते विद्यार्थी करू शकणार अर्ज, सीईटी सेलची माहितीवैद्यकीय पदवी प्रवेशाला विविध अभ्यासक्रमांसाठी प्रवेश घेऊ इच्छिणाºया विद्यार्थ्यांना सीईटी सेलकडून आणखी एक दिलासा मिळाला असून आतापर्यंत ज्या विद्यार्थ्यांनी नोंदणी केली नाही असे विद्यार्थी ४ जुलै मध्यरात्री १२ पासून ते ५ जुलै सायंकाळी ५ वाजेपर्यंत आॅनलाइन अर्ज करू शकतील. सोबतच ज्या विद्यार्थ्यांनी अर्ज केले आहेत मात्र आॅनलाइन गेटवेमार्फत शुल्क भरले नाही त्यांनाही ही संधी उपलब्ध असेल. यामुळे ते प्रवेश प्रक्रियेसाठी पात्र ठरतील. ज्या विद्यार्थ्यांनी प्रवेश प्रक्रियेसाठी सार पोर्टलवर नोंदणी केली होती, मात्र २२ जून ते २७ जूनदरम्यान ते पुन्हा नवीन प्रक्रियेमध्ये नोंदणी करू शकले नाहीत अशांसाठी ही सुवर्णसंधी ठरेल.

टॅग्स :वैद्यकीय