Join us
Daily Top 2Weekly Top 5

बिरवाडी तलावात मृत मासे

By admin | Updated: June 16, 2015 22:49 IST

महाड तालुक्यातील शंकर मंदिराच्या तलावातील मासे मृत्युमुखी पडल्याची घटना सोमवारी सकाळी घडली आहे. कल्लिकार्जुनेश्वर

बिरवाडी : महाड तालुक्यातील शंकर मंदिराच्या तलावातील मासे मृत्युमुखी पडल्याची घटना सोमवारी सकाळी घडली आहे. कल्लिकार्जुनेश्वर या शिवकालीन मंदिराचा गाभारा देखील पाण्याने भरून गेला आहे. औद्योगिक वसाहतीमधील कंपन्यांच्या रसायनयुक्त दूषित पाण्यामुळेच मासे मृत्युमुखी पडले आहेत. पावसाळ्यात पाण्याचा निचरा होण्याकरिता गटारे अपुरी पडत असल्याने रसायनयुक्त पाणी थेट तलावात व गाभाऱ्यात शिरत असल्याने या ठिकाणी येणाऱ्या भविकांची गैरसोय होत असल्याची माहिती या मंदिराचे पुजारी भागाराम गुरव यांनी दिली आहे. बिरवाडीच्या या मंदिरातील शंकराची पिंड स्वयंभू असल्याने ती गाभाऱ्यातून स्थलांतरित करणे शक्य नसल्याचे या मंदिरातील पुजारी भागाराम गुरव यांनी सांगितले. या मंदिरामध्ये बिरवाडी आणि परिसरातील भाविक दर सोमवारी तसेच श्रावण महिन्यात येत असतात. मात्र या मंदिर परिसराला औद्योगिक वसाहतीमधील कंपन्यांकडून होणाऱ्या जल व वायू प्रदूषणाचा फटका बसल्याने या ठिकाणी येणाऱ्या भाविकांची प्रचंड गैरसोय होत असते. तलाव दूषित झाल्याने भाविकांची याठिकाणी गैरसोय होत आहे. (वार्ताहर)या तलावातील पाण्याचे नमुने तपासणीकरिता ताब्यात घेण्यात आले आहेत. अहवाल प्राप्त झाल्यानंतर योेग्य ती कार्यवाही केली जाईल.- संजय औटी, उप-प्रादेशिक अधिकारी, महाराष्ट्र राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळ, महाड