अजित मांडके - ठाणो
ठाणो महापालिका हद्दीत फेरीवाला धोरण राबविण्यात येत असून याचाच एक भाग म्हणून महापालिकेच्या वतीने फेरीवाला नोंदणीचा कार्यक्रम हाती घेण्यात आला आहे. परंतु, तीन वेळा मुदतवाढ देऊनही फेरीवाले नोंदणीसाठी पुढे येत नसतांनाही त्यांच्यावर कारवाई करण्याऐवजी प्रशासनाने त्यांना मुदतवाढीची तारीख पे तारीख देऊन पाठीशी घालण्याचा प्रयत्न केला आह़े
मागील चार महिन्यात केवळ 6 हजार 843 फेरीवाल्यांनी नोंदणी केल्याचेही उघड झाले आहे.
फेरीवाला धोरण राबविण्याचाच एक भाग म्हणून मुख्य समितीच्या नेमणुकीनंतर आता शहरातील फेरीवाल्यांची नोंदणीचे काम प्रशासनाने हाती घेतले आहे. प्रत्येक प्रभाग समितीअंतर्गत यासाठी अर्ज उपलब्ध करुन देण्यात आले आहेत. सुरवातीला शहरात 5क् हजार फेरीवाले असल्याचे अपेक्षित धरुन पालिकेने यासाठी 5क् हजार अर्ज छापले होते. त्यानुसार नोंदणीची विशेष मोहीम हाती घेण्यात आली. परंतु, प्रत्यक्षात याला फारसा प्रतिसादच मिळाला नाही. जून महिन्यात केवळ सुमारे दोन हजार, त्यानंतर ऑगस्टर्पयत 4,5क्क् आणि 12 सप्टेंबर्पयत केवळ 6,843 फेरीवाल्यांनीच नोंदणी केल्याची माहिती सुत्रंनी दिली. फेरीवाले नोंदणी करण्यास पुढे सरसावत नसल्याने प्रशासनही हतबल झाले आहे.
दरम्यान फेरीवाल्यांना वारंवार नोंदणीसाठी तारीख पे तारीख दिली तरी देखील ते नोंदणीसाठी पुढे येत नसल्याचे लक्षात आले असतांनाही पालिका कारवाई करण्यासाठी पुढे आलेली नाही. त्यामुळे पालिकेने काढलेल्या फर्मानाची हवाची निघाली असल्याचे यातून स्पष्ट झाले आहे.
या संदर्भात विचारणा केली असता, प्रशासनाने हतबलता दर्शविली आहे. परंतु कारवाई करणार का? असा सवाल केला असता, पुन्हा कारवाई करण्याचे आश्वासन दिले असले तरी, मुदतवाढही दिली देण्याचे संकेत मिळाले आहेत.
4पहिल्या महिन्यात नोंदणी कमी झाल्याने पालिकेने फेरीवाल्यांना एक महिन्याची वाढीव मुदत दिली. परंतु या कालावधीतही त्यांनी नोंदणी केली नाही. त्यामुळे पालिकेने पुन्हा 15 दिवसांची मुदतवाढ दिली. परंतु, यानंतर जे फेरीवाले नोंदणी करणार नाहीत, त्यांच्यावर कारवाई केली जाईल, असा इशाराही पालिकेने दिला होता.
4परंतु कारवाईचे फर्मान काढूनही फेरीवाल्यांनी त्यांना भीक घातली नाही. असे असतांनाही आता पालिकेने नोंदणीसाठी पुन्हा एका आठवडय़ाची वाढीव मुदतवाढ दिली आह़े या कालावधीत नोंदणी न केल्यास जे नोंदणी करणार नाहीत, त्यांना या पुढे व्यवसाय करता येणार नसल्याचे आदेश जारी केले.
प्रभाग समितीवितरीत अजर्प्राप्त अजर्
नौपाडा16461283
कोपरी31क्2क्7
कळवा13331क्11
मुंब्रा15क्39क्9
रायलादेवी857541
वागळे9क्8598
वर्तकनगर1242967
माजिवडा-मानपाडा917591
उथळसर951728
एकूण96676843