मुंबई : अर्थकारणाच्या क्षेत्रातील महत्त्वाची व्यक्ती मोतीलाल ओसवाल यांना या वर्षाचा दर्शन सागर अॅवॉर्ड सादर करून त्यांचा सन्मान करण्यात आला आहे. अॅवॉर्ड समितीचे प्रमुख प्रवीण शाह यांनी दिलेल्या माहितीनुसार, मुजब राष्ट्रसंत आचार्य चंद्रानन सागर सूरीश्वर महाराज यांच्या सान्निध्यात ओसवाल यांना सन्मानित करण्यात आले. या वेळी लोढा ग्रुपचे चेअरमन मंगल प्रभात लोढा, नाहर ग्रुपचे चेअरमन सुखराज नाहर, भैरव ग्रुपचे मदनराज मुठलिया तसेच कॉर्पोरेटजगतातील अनेक महत्त्वाचा लोकांसोबत माजी मंत्री राज के. पुरोहित, मीरा-भार्इंदरच्या महापौर गीता जैन, मोती सेमलानी आणि निरंजन परिहार तसेच उद्योग, व्यापारजगतातील मान्यवर उपस्थित होते. मुलुंड येथील सर्वोदयनगरमध्ये आयोजित करण्यात आलेल्या समारंभात ओसवाल यांना राजस्थानी परंपरेनुसार साफा नेसवून शाल, श्रीफळ व सन्मानचिन्ह देऊन त्यांचा आदर सत्कार करण्यात आला. या समारंभात किरणराज लोढा, शैलेश जवेरी तसेच जयंत राही यांनाही दर्शन सागर अॅवॉर्ड देऊन सन्मानित करण्यात आले. सागर समुदायांचे गच्छाधिपती दर्शन सागर सूरीश्वरजी महाराजांच्या पुण्यतिथीचे औचित्य साधून मागील ११ वर्षांपासून दिला जाणारा हा अॅवॉर्ड समारोह मुलुंड येथे यंदा पहिल्यांदाच आयोजित करण्यात आला होता.
मोतीलाल ओसवाल यांना दर्शन सागर अॅवॉर्ड
By admin | Updated: September 25, 2016 03:38 IST