Join us

पारोळ परिसरात डासनाशक धूरफवारणी

By admin | Updated: November 10, 2014 01:07 IST

वसई परिसरात तसेच ग्रामीण भागांत मच्छरांचे वाढते साम्राज्य पाहता आणि डेंग्यू, मलेरियासारख्या जीवघेण्या तापाच्या रुग्णांची वाढती संख्या

पारोळ : वसई परिसरात तसेच ग्रामीण भागांत मच्छरांचे वाढते साम्राज्य पाहता आणि डेंग्यू, मलेरियासारख्या जीवघेण्या तापाच्या रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता पारोळ ग्रामपंचायतीच्या हद्दीत वसई-विरार महानगरपालिकेच्या वतीने डासविरोधी धूरफवारणी करण्यात आली.ग्रामीण परिसरांत डेंग्यू व मलेरियासारखे आजार डोके वर काढू लागल्याने जनतेचे आरोग्य धोक्यात आले आहे. या आजारांच्या खाजगी रक्त तपासण्या महाग असल्यामुळे सामान्य नागरिकांना ते परवडणारे नाही तसेच आरोग्य विभागाकडून या आजारांबाबत जनजागृती होत नसल्यामुळे जनता अजूनही अंधारातच आहे. हा धोका लक्षात घेता पारोळ ग्रामपंचायतीने डासविरोधी धूरफवारणी करण्याचा निर्णय घेतला. पण, ही बाब खर्चिक असल्यामुळे या पंचायतीला महानगरपालिकेचा आधार घ्यावा लागला. तीन मशीनच्या साहाय्याने संपूर्ण ग्रामपंचायत हद्दीत ही मोहीम राबवण्यात आली. (वार्ताहर)