अमुलकुमार जैन - बोर्ली-मांडला
अतिउत्साह आणि सुरक्षेच्या सूचनांकडे दुर्लक्ष यामुळेच पर्यटक समुद्रात तसेच इतर ठिकाणी मृत्यूस कारणीभूत ठरतात. पावसाच्या सुरुवातीनंतर डोंगर द:यामधून नद्या - नाले दुथडी भरुन वाहत असतात. डोंगर कडय़ावरुन कोसळणारे धबधबे, डोंगरावर विसवणारे ढग पहायला मिळत असून मुरुडमधील पर्यटन ठिकाणी येणा:या पर्यटकांची संख्या ही दिवसेंदिवस वाढत आहे. परंतु बहुतांश पर्यटक हे मद्यपानासह असभ्य संस्कृतीचे दर्शन घडवितात. मुरुड तालुक्यातील काशीद, मुरुड, फणसाड धबधबा, नांदगाव, एकदरा, राजपुरी या पर्यटनस्थळी 2क्क्क् पासून 31 ऑक्टोबर 2क्14 र्पयत 66 पर्यटकांचा बुडून मृत्यू झाला असून सर्वाधिक पर्यटकांचा म्हणजे 48 पर्यटकांचा काशीद समुद्र किनारी बुडून मृत्यू झाला आहे.
मुंबई - ठाणो, कल्याण - डोंबिवली, पुणो - नाशिक येथून पर्यटकांचा ओढा हा कोकणामध्ये वाढत आहे. त्यात रायगड जिल्हा जवळ आल्यामुळे रायगडात तर पर्यटक मोठय़ाप्रमाणावर येत आहे. पर्यटकांमध्ये तरुण वर्गाचा मोठा भरणा दिसत असून त्यांच्याकडून पर्यटन ठिकाणी व रस्त्याने जाता येता गैर व असभ्य वर्तन होत असल्याच्या तक्रारी स्थानिक नागरिक करीत आहेत. पावसाळय़ात खवळलेल्या समुद्रात विशिष्ट रचनेने वाळूची उंचसखलता बदलत असते. मिनिटागणिक याची समांतरता नष्ट होवून पोय(खड्डा)तयार होतो आणि पोहणारा तेथे फसतो आणि जलसमाधी मिळण्याची शक्यता वाढते. काशीद समुद्र किनारी ग्रामपंचायतीने मोठे फलक लावून पावसाळय़ात समुद्रात पोहणो धोक्याचे आहे.
मुरुड बिच येथे 1998 साली महिंद्रा अॅण्ड महिंद्रा कंपनीचे सात कर्मचारी यांचा सुध्दा अशा प्रकारे मृत्यू झाला होता. फणसाड धबधबा येथे 2 एकदरा 2 तर राजपुरी, नांदगाव - दांडा सर्वे येथे 6 जणांचा बुडून मृत्यू झाला आह मुंबई चेंबूर येथील रोहीत झाला, विनोद अणई, दिनेश पवार, संजय पांचाळ, दिलीप गोळे आणि शंकर चव्हाण यांना मद्यपान नडले.
4मुरुड : कोकण किनारपट्टीवरील समुद्र किनारे देश-विदेशातील हौशी पर्यटकांचे आकर्षण ठरू पाहत आहे. बीचवर वय विसरून धुमाकूळ घालून मस्त मज्जा करावी इथर्पयत ठीक आहे. भरती ओहोटीच्या लाटांची तीव्रता ध्यानी न आल्यामुळे समुद्राने गिळंकृत केले असा दोषारोप का करावा? अलिकडे काशीद बीचवर याची वारंवार प्रचिती येवू लागली आहे. नशेच्या आहारी जावून बेधुंद होत समुद्रात झेपावणो हे मृत्यूला कवटाळण्यासारखे आहे. पोलीस यंत्रणोला न जुमानता बुडण्याच्या घटना त्रसदायक ठरत आहेत.
4काशीद बीचवर पर्यटकांच्या आततायीपणामुळे काल तीन पर्यटक बुडाले. स्थानिकांनी शिकस्त करून तिघांना वाचविण्याचा आटोकाट प्रय} केला तथापि एकाचा अखेर अंत झाला. गेल्या 14 सप्टेंबर 2क्14 रोजी याच बीचवर बुडून मेल्याची घटना ताजी आहे. 6 जुलै 2क्14 रोजी मुरुड बीचवर 6 जण बुडाल्याचे वृत्त क्लेषकारक आहे.
4काशीद ग्रा. पं. ने बीचवर ठळकपणो खोल समुद्रात पोहणो धोकादायक आहे असे 3/4 जागी प्लॅक्स लावले असले तरी कोणीही गांभीर्याने घेत नाही. बुडालेल्या युवा, युवती उच्चशिक्षित आणि सधन कुटुंबातील व्यक्ती होत्या हे विशेष. ग्रामस्थांसह मुरुड तालुक्यातील तमाम नागरिकांसमोर बीच सुरक्षेचा प्रश्न ज्वलंत असून पर्यटन व्यवसायाला वाढीस लावण्यासाठी पर्यटकांची लाखमोलाची सुरक्षितता शासन, प्रशासनाने जपायला हवी.