Join us
Daily Top 2Weekly Top 5

विमानाच्या पायलटने पाहिला संशयास्पद बलून

By admin | Updated: October 6, 2016 04:48 IST

हवाई हल्ला होण्याच्यादृष्टिने हवाई उपकरणांवर मुंबई पोलिसांनी बंदी घातली आहे.

मुंबई : हवाई हल्ला होण्याच्यादृष्टिने हवाई उपकरणांवर मुंबई पोलिसांनी बंदी घातली आहे. ही बंदी घातलेली असतानाच एअर इंडिया विमानाच्या एका पायलटला संशयास्पद बलून दिसल्याची घटना बुधवारी सकाळी ९.३0 च्या सुमारास घडली. त्यामुळे एकच खळबळ उडाली. मुंबईहून नागपूरला येत असताना निळ्या रंगाचा संशयास्पद बलून विमानाच्या पायलटला दिसले. तात्काळ याची कल्पना हवाई नियंत्रण कक्षाला दिली. नियंत्रण कक्षाकडून विमानतळ पोलिसांना याची माहीती दिल्यानंतर तपास करण्यात आला. तपासात काहीच न आढळल्याने त्याची डायरी नोंद करण्यात आली. (प्रतिनिधी)