Join us

मुंबईत कोरोनाच्या सुपर स्प्रेडचा धोका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 1, 2021 04:06 IST

वर्सोवा बीचवर कोरोनाचे नियम पाळत नागरिकांनी सकाळी व संध्याकाळी मित्रमंडळी व कुटुंबासह फेरफटका मारत समुद्राचा आनंद लुटला. रविवारच्या ...

वर्सोवा बीचवर कोरोनाचे नियम पाळत नागरिकांनी सकाळी व संध्याकाळी मित्रमंडळी व कुटुंबासह फेरफटका मारत समुद्राचा आनंद लुटला. रविवारच्या सुटीचा आनंद घेण्यासाठी नागरिकांनी येथील सात बंगला बीच, पिकनिक कॉटेज, मच्छलीमार या ठिकाणी संध्याकाळी गर्दी केली होती, तर एकांताचा आस्वाद घेण्यासाठी मावळत्या सूर्याला निरोप देत पिकनिक कॉटेज, मच्छलीमार या ठिकाणी खडकात बसून प्रेमाचा आनंद लुटत होते. तर मास्क लावत व फिजकिशन डिस्टन्सिंग पाळत नागरिक बीच वॉक करत होते. दरम्यान, वेसावे व मढ जेट्टी दरम्यान फेरीबोटीत कोरोनाचे नियम पाळत व मास्क घालूनच नागरिक प्रवास करत होते, अशी माहिती वेसावा मच्छिमार सहकारी सोसायटीचे अध्यक्ष महेंद्र लडगे यांनी दिली.

हाजीअली

हाजीअली येथे फिरण्यास येत असलेले नागरिक मास्क घालण्याबाबत हलगर्जीपणा करत आहेत. विशेषत: येथील टॅक्सीचालकदेखील कोरोनाचे नियम धाब्यावर बसवत असून, येथील गर्दीने तर उच्चांक गाठला आहे.

दादर आणि कुर्ला मार्केट

दादर आणि कुर्ला रेल्वेस्थानकाच्या पूर्व आणि पश्चिमेला उसळणाऱ्या गर्दीने तर कहर केला आहे. विशेषत: शनिवारसह रविवारी कुर्ला रेल्वेस्थानकाच्या पश्चिमेला आणि दादर रेल्वेस्थानकाच्या पूर्व व पश्चिमेला मोठी गर्दी होत असून, नागरिक मास्क नीट वापरत नसल्याचे चित्र आहे. विशेषत: कुर्ला पश्चिम येथे तर खूपच वाईट अवस्था असून, येथे मास्क वापरण्याबाबत हलगर्जीपण बाळगण्यात येत आहे.