Join us
Daily Top 2Weekly Top 5

‘दंगल’च्या अभिनेत्रींची रस्ता सुरक्षा सप्ताहात हजेरी

By admin | Updated: January 23, 2017 05:32 IST

दंगल चित्रपटात गीता, बबिताची भूमिका साकारणाऱ्या फातिमा सना शेख आणि सान्या मल्होत्रा यांच्यासह प्रसिद्ध अभिनेते अर्जुन रामपाल

ठाणे : दंगल चित्रपटात गीता, बबिताची भूमिका साकारणाऱ्या फातिमा सना शेख आणि सान्या मल्होत्रा यांच्यासह प्रसिद्ध अभिनेते अर्जुन रामपाल यांनी रविवारी ठाणे प्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालयाच्या रस्ता सुरक्षा सप्ताहात हजेरी लावली. सुरक्षित प्रवासाचे धडे त्यांनी या वेळी दिले.विवियाना मॉलमध्ये झालेल्या या कार्यक्रमात कलाकारांनी हेल्मेटचे महत्त्व विशद करून वाहतुकीच्या नियमांचे पालन करण्याचे आवाहन केले. फातिमा आणि सान्या यांनी बेशिस्त पद्धतीने वाहन चालवणाऱ्या त्यांच्या काही मित्रांचे अनुभव कथन केले. मद्यप्राशन करून वाहन चालवणे धोकादायक आहे. स्वत:च्या आणि इतरांच्या जीवनाचे महत्त्व ओळखण्याचे आवाहन अर्जुन रामपाल यांनी केले. वाहतूक नियमांची माहिती देणाऱ्या पत्रकांचे वितरण या वेळी त्यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमास प्रादेशिक परिवहन विभागाचे सचिव प्रवीण गेडाम, ठाण्याचे प्रादेशिक परिवहन अधिकारी जितेंद्र पाटील, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी हेमांगिनी पाटील, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी श्याम लोही, कल्याणचे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी नंदकिशोर नाईक, सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी राजेंद्र शिंदे आणि ठाणे प्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. (प्रतिनिधी)