Join us

पश्चिम उपनगरात रंगणार दांडिया रास

By admin | Updated: September 25, 2014 01:29 IST

पश्चिम उपनगरातील दांडिया रास नेहमीच तरुणाईचा आकर्षण ठरतो. या ठिकाणी तरुणाईला सेलीब्रिटी गायकांच्या गाण्यावर फेर धरण्याची संधी मिळते.

मुंबई : पश्चिम उपनगरातील दांडिया रास नेहमीच तरुणाईचा आकर्षण ठरतो. या ठिकाणी तरुणाईला सेलीब्रिटी गायकांच्या गाण्यावर फेर धरण्याची संधी मिळते. पश्चिम उपनगरात सर्वात मोठा गरबा रास असतो तो गोरेगाव स्पोर्ट्स क्लब येथील संकल्प गरबा. दरवर्षीप्रमाणे यंदाही फाल्गुनी पाठक तिच्या अल्बमच्या गाण्यांवर तरुणाईला फेर धरायला लावणार आहे. फाल्गुनीला साथ असणार आहे ती गायक राहुल वैद्यची. यंदा नऊ दिवस फाल्गुनी तेरा अल्बममधील गाणी सादर करणार आहे. बोरीवली धर्मा नगर कच्छी ग्राउंड येथे प्रीती-पिंकी या बहिणींची जोडी आपल्या गाण्यांच्या तालावर तरुणाईला फेर धरायला लावणार आहे. बोरीवली लिंक रोड कोरा केंद्र येथेही सर्वात मोठ्या गरब्याचे आयोजन करण्यात येते. (प्रतिनिधी)