Join us

जिल्ह्यात धरणांनी तळ गाठला

By admin | Updated: April 17, 2015 22:42 IST

रायगड जिल्ह्यातील लघुपाटबंधारे विभागाच्या अखत्यारीतील २८ प्रकल्पांत केवळ ३६ टक्के एवढाच पाणीसाठा शिल्लक राहिला आहे.

आविष्कार देसाई ल्ल अलिबागरायगड जिल्ह्यातील लघुपाटबंधारे विभागाच्या अखत्यारीतील २८ प्रकल्पांत केवळ ३६ टक्के एवढाच पाणीसाठा शिल्लक राहिला आहे. फणसाड, कवेळे, रानिवली आणि वरंध ही धरणे काही दिवसांतच आटण्याची शक्यता आहे. प्रादेशिक योजनेतील तीनवीरा आणि शहापाडा धरणाने अक्षरश: तळ गाठला आहे. परिणामी, येत्या काही दिवसांत जिल्ह्यात भीषण पाणीटंचाईला सामोरे जावे लागणार आहे.सत्ताधाऱ्यांचा योग्य नियोजनाचा अभाव आणि प्रशासनाच्या बेफिकिरीचा फटका जिल्ह्यातील जनतेला पाणीटंचाईचे चटके सोसण्यास भाग पाडत असल्याचे यानिमित्ताने पुन्हा एकदा अधोरेखित होत आहे.जिल्ह्यात सरासरी साडेतीन हजार मिलीमीटर पावसाची नोंद होते. एवढ्या मुबलक प्रमाणात पाऊस पडूनही जिल्ह्यात एप्रिल महिन्याच्या सुरुवातीलाच पाणीटंचाईचे चटके बसण्यास सुरुवात होते. पाण्यासाठी वणवण करावी लागत असल्याने सुमारे साडेसहा कोटी रुपयांचा पाणीटंचाई कृती आराखडा जिल्हा प्रशासनाला मंजूर करावा लागला आहे. समाधानाची बाब म्हणजे अलिबाग तालुक्यातील उमठे धरणामध्ये प्रचंड प्रमाणात पाणीसाठा शिल्लक असल्याने रेवदंडा, चौल, आक्षी, नागाव, रामराज, महान या ठिकाणच्या ५३ हजार लोकसंख्येला पाण्याची कमतरता भासणार नाही.मुरुड तालुक्यातील फणसाड धरणात १०.९० टक्के, महाड तालुक्यातील वरंध धरणात फक्त १०.३२ टक्के, सुधागड तालुक्यातील कवेळे २८.२१ टक्के आ़णि श्रीवर्धन तालुक्यातील रानिवली धरणात १६.६ टक्के पाणी साठा शिल्लक आहे.कोलाडसालसाठा (द.ल.घ.मी.)२०१५ ५.५६२ २०१४ ५.८७७ २०१३ ६.०७० २०१२ ५.५०१ २०११ ६.०९१ २०१० ४.३५२ माणगाव सालसाठा (द.ल.घ.मी.)२०१५ ३.८९१ २०१४ ३.१८ २०१३ ३.२५३ २०१२ २.८५८ २०११ ३.७५८ २०१० २.१३३ कर्जत सालसाठा (द.ल.घ.मी.)२०१५ ९.४६० २०१४ ८.५९ २०१३ ७.१०० २०१२ ९.००० २०११ ८.६७ २०१० ७.४६०रवाळजेसालसाठा (द.ल.घ.मी.)२०१५ ५.८६३ २०१४ ६.७३० २०१३ ५.००५ २०१२ ५.५६० २०११ ६.३०७ २०१० ४.५३१