वसई : घरगुती गॅस सिलिंडरच्या दरात भरमसाट वाढ केल्याच्या निषेधार्थ काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी बुधवारी तहसीलदार कार्यालयासमोर निदर्शने केली. यामध्ये मूठभर पदाधिकारीच सहभागी झाले होते.केंद्र सरकारने गॅस दरात भरमसाट वाढ केल्याच्या निषेधार्थ वसई काँग्रेसने धरणे आंदोलन करण्याचा इशारा दिला होता. आज काही कार्यकर्त्यांनी तहसील कचेरीसमोर निदर्शने केली. ही दरवाढ त्वरित मागे घेण्यात यावी, अशी मागणी या वेळी करण्यात आली. या आंदोलनाचे नेतृत्व वसई शहर काँग्रेस समितीचे अध्यक्ष मायकल फुर्ट्याडो यांनी केले. लोकसभा व विधानसभा निवडणुकांत पराभव झाल्यानंतर आता काँगे्रसजन सर्वसामान्यांच्या प्रश्नावर आंदोलन करत असल्याबाबत चर्चा होत आहे. (प्रतिनिधी)
गॅस दरवाढीविरोधात काँग्रेसचे धरणे
By admin | Updated: November 5, 2014 22:41 IST