Join us

भाजपाकडून दलितांचा भ्रमनिरास

By admin | Updated: February 20, 2015 01:15 IST

महाराष्ट्रात भाजपाचे सरकार येऊन १०० दिवस उलटले परंतु दलित समाजातील कार्यकर्त्यांकडे या पक्षाकडूनही दुर्लक्ष होत असल्याची टीका देगलूर मतदारसंघातील पराभूत उमेदवार भीमराव क्षीरसागर यांनी केली आहे.

मुंबई : महाराष्ट्रात भाजपाचे सरकार येऊन १०० दिवस उलटले परंतु दलित समाजातील कार्यकर्त्यांकडे या पक्षाकडूनही दुर्लक्ष होत असल्याची टीका देगलूर मतदारसंघातील पराभूत उमेदवार भीमराव क्षीरसागर यांनी केली आहे. भाजपाने दलित समाजातील तरुण कार्यकर्त्यांवर जबाबदारी टाकून त्यांना सक्रिय राजकारणात स्थान द्यावे, अशी मागणीही क्षीरसागर यांनी केली.नांदेड जिल्ह्यातील देगलूर मतदारसंघातून क्षीरसागर हे उमेदवार होते. प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात त्यांनी म्हटले आहे की, आपण अत्यंत प्रामाणिकपणे निवडणूक लढवूनही स्थानिक भाजपा नेत्यांनी विशेषत: काँग्रेसमधून भाजपामध्ये नव्याने दाखल झालेल्या काही नेत्यांनी शिवसेनेला मदत केली. त्यामुळे आपला पराभव झाल्याचे क्षीरसागर यांचे मत आहे. पराभवानंतर निराश न होता पक्षाचे काम सुरू ठेवले. परंतु पक्ष आपल्याला सक्रिय राजकारणात सहभागी करून घेत नसल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. (प्रतिनिधी)