Join us

दलित समाज नसीम खान यांच्या पाठीशी

By admin | Updated: October 13, 2014 04:14 IST

चांदिवली विधानसभा मतदारसंघातील काँग्रेसचे उमेदवार मोहंमद आरिफ (नसीम) खान यांना दलित समाजातील सर्व गटांनी पाठिंबा दर्शवला आहे.

मुंबई : चांदिवली विधानसभा मतदारसंघातील काँग्रेसचे उमेदवार मोहंमद आरिफ (नसीम) खान यांना दलित समाजातील सर्व गटांनी पाठिंबा दर्शवला आहे. गेल्या १५ वर्षांपासून नसीम खान यांनी दलित समाजासाठी अनेक कामे केल्याने हा पाठिंबा देण्यात आल्याचे या गटांनी म्हटले आहे.विविध बुद्ध विहारांचे नूतनीकरण, पुनर्बांधणी, दलित वस्तीमध्ये विविध विकासकामे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यानाचे सौंदर्यीकरण, पवई तलावात तथागत गौतम बुद्धांचा १२५ फुटांचा पूर्णाकृती पुतळा उभारण्याचा प्रस्ताव मुंबई महानगरपालिकेत सादर करून त्याचा सतत पाठपुरावा करण्याचे काम सुरू केले आहे. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न पुरस्कार मिळावा, यासाठी महाराष्ट्र शासनातर्फे केंद्र शासनाकडे पाठपुरावा सुरू आहे. या कामांमुळे रिपब्लिकन पार्टी आॅफ इंडिया (आठवले गट) चे सर्व पदाधिकारी, रिपब्लिकन सेना (आनंदराज आंबेडकर) भारिप बहुजन महासंघ (प्रकाश आंबेडकर) यांनी तुंगा गाव, साकीविहार रोड पवई येथे झालेल्या सभेत जाहीर पाठिंबा दिला. या कार्यक्रमास मुंबई प्रदेश सचिव नारायण खरबडे, मुंबई प्रदेश उपाध्यक्ष बाबूशा कांबळे, बी. डी. सकपाळ, मुंबईचे नेते योगीराज भोसले, चांदिवली तालुका सरचिटणीस प्रकाश कांबळे तसेच संपूर्ण वॉर्डांचे अध्यक्ष उपस्थित होते. (प्रतिनिधी)