Join us
Daily Top 2Weekly Top 5

राज्यात दैनंदिन रुग्णसंख्या पुन्हा सहा हजारांवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 20, 2021 04:06 IST

मुंबई : राज्यात रविवारी दैनंदिन रुग्णसंख्या नऊ हजारांवर पोहोचली होती. सोमवारी यात घट झालेली दिसून आली. सोमवारी ६ हजार ...

मुंबई : राज्यात रविवारी दैनंदिन रुग्णसंख्या नऊ हजारांवर पोहोचली होती. सोमवारी यात घट झालेली दिसून आली. सोमवारी ६ हजार १७ रुग्ण आणि ६६ कोरोना बाधितांचा मृत्यू झाल्याची नोंद झाली आहे. तर दिवसभरात बरे होणाऱ्यांची संख्या अधिक आहे. सोमवारी १३ हजार ५१ रुग्ण बरे होऊन घरी गेले असून, आतापर्यंत एकूण ५९ लाख ९३ हजार ४०१ रुग्ण कोविडमुक्त झाले आहेत. सध्या ९६ हजार ३७५ रुग्ण उपचाराधीन आहेत, अशी माहिती राज्याच्या आरोग्य विभागाने दिली आहे.

राज्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९६.३५ टक्के असून, राज्यातील मृत्यूदर २.४ टक्क्यांवर स्थिरावला आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ४ कोटी ५६ लाख ४८ हजार ८९८ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी १३.६३ टक्के नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात ५ लाख ६१ हजार ७९६ व्यक्ती होम क्वारंटाईनमध्ये आहेत, तर ४ हजार ५२ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

राज्यातील कोरोना बाधितांची एकूण संख्या ६२ लाख २० हजार २०७ झाली असून, बळींचा आकडा १ लाख २७ हजार ९७ झाला आहे. दिवसभरात नोंद झालेल्या ६६ मृत्यूंमध्ये मुंबई १४, ठाणे १३, ठाणे मनपा १, नवी मुंबई मनपा २, पालघर ३, रायगड १, अहमदनगर १, पुणे ४, पुणे मनपा १, सोलापूर ४, सातारा ८, कोल्हापूर ७, सांगली मनपा ५, सिंधुदुर्ग २, रत्नागिरी २, जालना १, बीड ३, अमरावती १, नागपूर ३ इ. रुग्णांचा समावेश आहे.