Join us  

दहिसर होणार आता नवे  पर्यटन स्थळ

By ऑनलाइन लोकमत | Published: November 19, 2020 3:00 PM

Tourist destination : कांदळवन उद्यान व एनर्जी पार्क

मनोहर कुंभेजकर

मुंबई: मुंबईचे शेवटचे टोक दहिसर आहे,तर दहिसर पश्चिम प्रभाग क्रमांक 1 पासून पालिकेच्या वॉर्डची सुरवात होते.दहिसरच्या शिरपेचात मनाचा तुरा रोवला जाणार असून मुंबईच्या नकाशात भविष्यात येथे साकारणाऱ्या एनर्जी पार्कची उभारणी, कांदळवन उद्यानाची उभारणी व कचऱ्या पासून वीज निर्मिती या विविध प्रकल्पांमुळे आता दहिसरची ओळख ही नवे पर्यटन स्थळ म्हणून होणार साहे. आता स्वतः राज्याचे पर्यावरण मंत्री व उपनगराचे पालक मंत्री आदित्य ठाकरे यांनी लक्ष घातल्याने प्रभाग क्रमांक 1 मधील समस्या आता लवकर सुटणार आहे.

 आदित्य ठाकरे यांच्या समवेत विभागातील विविध समस्येबाबत चर्चा करण्याकरिता सह्याद्री अतिथी गृहात नुकतीच एक बैठक आयोजित केली होती.स्थानिक  नगरसेविका तेजस्वी घोसाळकर यांनी आपल्या दहिसर प्रभाग क्रमांक 1 मधील विविध नागरी समस्या प्रश्नांबाबत यावेळी निवेदन सादर केले.विभागप्रमुख व आमदार विलास पोतनीस,मुंबै बँकेचे संचालक व माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यावेळी उपस्थित होते.

यावेळी गणपत पाटील नगर येथील प्रस्तावित विकासकामे,कचऱ्यापासून वीज निर्मिती,दहिसर नदीवर संरक्षक भिंत बांधणे, एनर्जी पार्कची उभारणी,कांदळवन उद्यानाची उभारणी या विविध विषयांवर मंत्रीमहोदयां बरोबर सविस्तर चर्चा झाली. येथील समस्या लवकर सोडवण्याचे आश्वासन आदित्य ठाकरे यांनी यावेळी दिले.

कांदळवन उद्यानदहिसर पश्चिम सीटीएस क्रमांक १९२९ ते १९३१ याठिकाणी कांदळवन उद्यानबाबत जनजागृती माहिती देण्याचा प्रस्ताव कांदळवन सुधारक घटक वन विभाग, महाराष्ट्र राज्य यांच्या मार्फत प्रस्तावित आहे. महाराष्ट्र निसर्ग पर्यटन महामंडळाकडून सदर प्रकल्प सदर प्रकल्प निसर्ग पर्यटन प्रकल्प म्हणून घोषित करण्यात आला आहे. या ठिकाणी एमसीझेड व सीआरझेड परवानगी प्राप्त आहे. तरी या संदर्भात आराखडा तसेच मार्गदर्शन करण्याची मागणी घोसाळकर यांनी आदित्य ठाकरे यांच्याकडे केली.

एनर्जी पार्क शहीद तुकाराम ओंबळे मैदानात एनर्जी पार्क करण्याबाबत प्रस्ताव महानगरपालिकेकडे देण्यात आला आहे. सदर एलर्जी पार्कमध्ये शैक्षणिक व सामाजिक जनजागृतीसाठी ऊर्जानिर्मिती बाबतची माहिती, त्याचे फायदे तोटे व संवर्धन आदी माहिती उपलब्ध करून देण्यात येणार आहे. त्यामुळे या ठिकाणी एक आगळेवेगळे पर्यटन स्थळ निर्माण होईल. तरी या प्रकल्पासाठी मुंबई महानगरपालिकेतर्फे आराखडा उपलब्ध करून देण्याची मागणी तेजस्वी घोसाळकर यांनी यावेळी केली.

गणपत पाटील नगर ही ५० हजार लोकसंख्या असलेली २५ वर्षे जुनी झोपडपट्टी आहे. सदर परिसर सीआर झेड,एम आर झेडमध्ये वसलेले असून उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार मुंबई महानगरपालिकेतर्फे येथील 2000 सालापर्यंतच्या झोपड्यांना पाणीपुरवठा तसेच टाटा पॉवरच्या माध्यमातून वीज पुरवठा देण्यास सुरुवात झाली आहे. सदर ठिकाणी नागरी सुविधांचा मोठा अभाव आहे. त्या ठिकाणी लोकांना ये-जा करण्याकरता असलेल्या पायवाटा मातीच्या आहेत. तसेच पावसाळी पाणी वाहून नेण्यासाठी गटारांची सुविधा उपलब्ध नाही. त्यामुळे या पावसाळ्यात परिसर जलमय होतो. तसेच ठिकाणी शौचालयाची सुविधा अपुऱ्या आहेत. याबाबत  सहकार्य करण्याची मागणी मंत्री महोदयांना करण्यात आली.

दहिसर पश्चिम कांदरपाडा स्मशानभूमी येथील सीटीएस क्रमांक 347 याठिकाणी सुक्‍या कचऱ्याचे वर्गीकरण प्रकल्पाची उभारणी करण्यात आली आहे. या ठिकाणी उपलब्ध अतिरिक्त जागेत ओल्या कचऱ्यापासून वीजनिर्मिती करण्याचे करण्याचा प्रस्ताव महानगरपालिकेकडे प्रलंबित असून या प्रकल्पासाठी योग्य तो आराखडा व निधी देण्याची मागणी यावेळी करण्यात आली.

 प्रभाग क्रमांक १ मधील दहिसर नदी येथील ५० मीटर संरक्षण भिंतीचे काम येथील कांदळवनामुळे रखडले आहे. तरी याबाबत योग्य ती परवानगी देण्याची मागणी यावेळी करण्यात आली. 

टॅग्स :मुंबईदहिसरपर्यटन