Join us

दहिसर स्पोर्ट्स फाउंडेशनच्या रोलर स्केटिंग सिंथेटिक ट्रॅकचे सुभाष देसाई यांच्या हस्ते उद्घाटन

By मनोहर कुंभेजकर | Updated: April 11, 2023 16:13 IST

दहिसर स्पोर्ट्स फाउंडेशन तर्फे गेली 24 वर्षे विविध क्षेत्रातील क्रीडा प्रशिक्षण दिले जात असून संस्थेच्या अनेक खेळाडूंनी आंतरराष्ट्रीय- राष्ट्रीय स्पर्धेत विशेष कामगिरी केली आहे.

मुंबई-दहिसर स्पोर्ट्स फाउंडेशन मैदानात नुतनिकरण करण्यात आलेल्या पश्चिम उपनगरातील सर्वाधिक मोठ्या रोलर स्केटिंग सिंथेटिक ट्रॅकचे उद्घाटन शिवसेना नेते , माजी उद्योग मंत्री सुभाष देसाई यांच्या हस्ते करण्यात आले. शिवसेना उपनेते, म्हाडाचे माजी सभापती डॉ.विनोद घोसाळकर यांच्या संकल्पनेतून दहिसरमध्ये हा स्केटिंग सिंथेटिक ट्रॅक बनविण्यात आला आहे. या माध्यमातून पश्चिम उपनगरातील  विद्यार्थी स्केटिंगमध्ये जागतिक स्पर्धेत आपल्या देशाचे नाव उंचावतील असा विश्वास  सुभाष देसाई यांनी यावेळी व्यक्त केला. तर शेकडो स्केटिंग प्रेमींनी सादर केलेल्या कलागुणांनी उपस्थितांची मने जिंकली.

दहिसर स्पोर्ट्स फाउंडेशन तर्फे गेली 24 वर्षे विविध क्षेत्रातील क्रीडा प्रशिक्षण दिले जात असून संस्थेच्या अनेक खेळाडूंनी आंतरराष्ट्रीय- राष्ट्रीय स्पर्धेत विशेष कामगिरी केली आहे. पश्चिम उपनगरात दहिसर स्पोर्ट्स फाउंडेशन क्रीडा पंढरी म्हणून ओळखली जाते. यंदाच्या उन्हाळी प्रशिक्षण शिबिरा 2023 चा सुरवात झाली असून प्रशिक्षण भूपेश पार्मेकर यांच्या मार्गदर्शनाखाली यंदा क्रिश मायावंशी व कशिष कपाडिया या खेळाडूंनी राष्ट्रीय स्पर्धेत विशेष चमक दाखवली आहे.

याप्रसंगी माजी विभागप्रमुख व आमदार विलास पोतनीस, महिला विभाग संघटक सुजाता शिंगाडे, माजी नगरसेविका तेजस्वी घोसाळकर, मुंबई बँक संचालक अभिषेक घोसाळकर , विधानसभा संघटक  अविनाश लाड, शाखाप्रमुख सुधाकर राणे, शाखा समनव्यक उत्तम परब, शाखा संघटक दीपाली चुरी, मानसी म्हातले, दहिसर स्पोर्ट्स फौंडेशनचे भरत वसानी व प्रशिक्षण घेणारे विद्यार्थी पालकवर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टॅग्स :मुंबई