Join us

दहिसरमध्ये दरोड्याचा डाव फसला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 15, 2020 04:24 IST

दहिसरमध्ये दरोड्याचा डाव फसलातिघांना अटक; दाेघे पसारलोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : शस्त्रांच्या मदतीने दरोडा टाकण्यासाठी आलेल्या तिघांना ...

दहिसरमध्ये दरोड्याचा डाव फसला

तिघांना अटक; दाेघे पसार

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : शस्त्रांच्या मदतीने दरोडा टाकण्यासाठी आलेल्या तिघांना रविवारी दहिसर पाेलिसांनी अटक केली असून अन्य दोघांचा शोध सुरू आहे.

अक्रम, रवींद्र आणि विक्की अशी अटक आराेपींची नावे आहेत. दहिसर पूर्वच्या वैशालीनगर परिसरात काही जण दरोडा टाकण्यासाठी येणार असल्याची माहिती उपनिरीक्षक डॉ. चंद्रकांत घार्गे यांना मिळाली. त्यानुसार परिमंडळ १२ चे पोलीस उपायुक्त डॉ. डी. एस. स्वामी आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक एम. एम. मुजावर यांच्या मार्गदर्शनाखालील पथकाने सापळा रचून तिघांना अटक केली. दोन साथीदार पसार होण्यात यशस्वी झाले. अटक आरोपी हे अभिलेखावरील गुन्हेगार असून त्यांच्याकडून रॉड, चॉपर, कटर अशा दरोड्यासाठी लागणाऱ्या वस्तू हस्तगत करण्यात आल्या आहेत. स्थानिक न्यायालयाने त्यांना तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. पसार दोघांचा शोध सुरू आहे.

....................