Join us

दहिसर मतदार संघ वार्तापत्र...........

By admin | Updated: October 4, 2014 22:54 IST

दहिसर मतदार संघ वार्तापत्र

दहिसर मतदार संघ वार्तापत्र
.................................
शिवसेनेपुढे बालेकिल्ला शाबूत ठेवण्याचे मोठे आव्हान
जयाज्योती पेडणेकर
मुंबई: महायुती आणि आघाडी बिघडल्याचे परिणाम दहिसर मतदार संघात दिसणार आहे. या मतदारसंघात चौरंगी लढत होत आहे. तीन राजकीय पक्षांच्या विद्यमान महिला नगरसेविका विद्यमान आमदारासमोर विरोधक उमेदवार म्हणून उभ्या ठाकल्या आहेत. दहिसर विधानसभा मतदारसंघ हा शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. त्यामुळे शिवसेनेच्या विद्यमान आमदारासमोर बालेकिल्ला साबूत ठेवण्याचे मोठे आव्हान आहे.
दहिसर मतदार संघात सध्या परिस्थिती बदलल्याने शिवसेनेच्या उमेदवाराला गेल्यावेळी इतकी तरी मते मिळतील का, याबाबत प्रश्नचिन्ह आहे. पूर्वीपासून यामतदारसंघात शिवसेना व काँग्रेसचे प्राबल्य होते. शुभा राऊळ यांनी बंड करुन ऐन उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी मनसेत प्रवेश केल्यानेे शिवसेनेची पारंपरिक मते विभागली जाण्याची शक्यता आहे. या मतदारसंघात राष्ट्रवादी पक्षाने इतक्या वर्षांत जम बसवलेला नाही, त्यामुळे या मतदारसंघात काँग्रेस, शिवसेना, भाजप, मनसे अशी चौरंगी लढत होणार आहे. मनसे, भाजप, काँग्रेस या तीन राजकीय पक्षांनी महिला नगरसेविकांनी उमेदवारी दिल्याने शिवसेनेचे विद्यमान आमदार विनोद घोसाळकर हे चक्रव्यूहात अडकल्याचे दिसत आहे.
या मतदारसंघातून शिवसेनेचे विद्यमान आमदार विनोद घोसाळकर, काँग्रेसच्या शीतल म्हात्रे, भाजप मनीषा चौधरी, मनसे शुभा राऊळ, राष्ट्रवादीचे हरीश शे˜ी हे निवडणुकीच्या रिंंगणात आहेत. मराठी, ख्रिश्चन, गुजराती, आगरी कोळी, उत्तरभारतीय असा मिश्र भाषिक असलेला हा मतदारसंघ आहे. उमेदवार असलेल्या तिन्ही नगरसेविकांचे वार्ड या मतदार संघातीलच आहेत, त्यामुळे तिघींचे वार्डनुसार वोटबँक सुरक्षित आहेत. गणपत पाटील नगर झोपडप˜ी ही मोठी लोकवसाहत असून येथे सर्वांत जास्त उत्तरभारतीयांचा भरणा आहे. तर आय.सी.कॉलनी या वसाहतीत जास्त भरणा हा ख्रिश्चन समाजाचा आहे. या दोन्ही वसाहती नगरसेवक वॉर्डनिहाय घोसाळकरांचा मुलगा व नगरसेवक असलेल्या अभिषेक घोसाळकरांकडे येतात. त्यामुळे या मतदारसंघाचा कल घोसाळकरांकडे जाण्याची शक्यता आहे. २००९ साली या मतदारसंघातून मनसेच्या संजना घाडी यांचा पराभव करुन शिवसेनेच्या विनोद घोसाळकर यांनी दहिसर मतदारसंघावर विजय मिळविला होता.