Join us
Daily Top 2Weekly Top 5

दहीहंडीप्रकरणी पोलिसांनी हात झटकले !

By admin | Updated: September 2, 2015 03:09 IST

दहीहंडीच्या वादंगावरून सुरू असलेला संभ्रम काहीसा निवळत असताना आता दहीहंडीप्रकरणी पोलीस आयुक्तालयाने हात झटकले आहेत.

मुंबई : दहीहंडीच्या वादंगावरून सुरू असलेला संभ्रम काहीसा निवळत असताना आता दहीहंडीप्रकरणी पोलीस आयुक्तालयाने हात झटकले आहेत. या प्रकरणी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाच विचारणा करण्याची सूचना केली आहे. त्यामुळे उत्सवाच्या दिवशी पोलिसांची नेमकी भूमिका काय असेल, याकडे सर्वांचेच लक्ष लागून राहिले आहे.सर्वोच्च न्यायालयाने दहीहंडी प्रकरणी धर्मादाय आयुक्त, गृह विभाग आणि पोलिसांना दिलेल्या निर्देशांची अंमलबजावणी कशा पद्धतीने करण्यात आली, याबद्दल याचिकाकर्त्या स्वाती पाटील यांनी या सर्व विभागांकडे माहिती अधिकारान्वये माहिती मागितली होती. परंतु याविषयी पोलीस आयुक्तालयाने कोणतीच माहिती न देता मौन बाळगणेच पसंत केले आहे. शिवाय याविषयी थेट गृह विभागाची धुरा सांभाळणारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेच उत्तर देतील, असे सांगत हाथ झटकले.