Join us

डहाणूला जिल्हाधिका:याची भेट

By admin | Updated: November 27, 2014 22:40 IST

प्राथमिक आरोग्य केंद्र, तसेच डहाणूतील उपजिल्हा रुग्णालयाची पाहणी करून व तेथील वैद्यकीय अधिकारी तसेच रुग्णसेवेबाबतची माहिती घेऊन समाधान व्यक्त केले.

डहाणू : पालघरचे जिल्हाधिकारी अभिजीत बांगर यांनी आज डहाणू तालुक्याला भेट देऊन येथील आo्रमशाळा, वस्तीगृह, प्राथमिक आरोग्य केंद्र, तसेच डहाणूतील उपजिल्हा रुग्णालयाची पाहणी करून व तेथील वैद्यकीय अधिकारी तसेच रुग्णसेवेबाबतची माहिती घेऊन समाधान व्यक्त केले.
पालघर जिल्हयाचे जिल्हाधिकारी अभिजीत बांगर आज डहाणूच्या दौ:यावर होते. त्यांचे सोबत डहाणूचे उपविभागीय (प्रांत) अधिकारी अंजली भोसले, जिल्हा पुरवठा अधिकारी उमेश बिरारी, सहाय्यक प्रकल्प अधिकारी निलम राउत इ. शासकीय अधिकारी व कर्मचारी सोबत होते. यावेळी जिल्हाधिका:यांनी आo्रमशाळेची पाहणी बरोबरच आदिवासी विकास विभागाचे बोर्डी येथील वस्तीगृहाला भेट देऊन पाहणी केली. त्यानंतर जिल्हाधिकारी यांनी घोलवडचे प्राथमिक आरोग्य केंद्र तसेच डहाणूचे उपजिल्हा रुग्णालय येथे जाऊन तेथे रुग्णांना मिळणा:या सोयी, सुविधा बरोबरच स्वच्छता तसेच नियुक्ती झालेल्या वैद्यकीय अधिका:याच्या बाबतीत माहिती घेऊन आढावा घेतला. दरम्यान डहाणूच्या तहसिलदार कार्यालयाला जिल्हाधिका:यांनी भेट देऊन तेथील पुरवठा विभागाच्या अधिका:यांना बोलवून अन्नसुरक्षा योजनेअंतर्गत माहिती घेतली. 
यावेळी डहाणूचे नगराध्यक्ष मिहिर शाह तसेच माजी नगराध्यक्ष रविंद्र फाटक यांनी जिल्हाधिका:यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. 
(वार्ताहर)