Join us
Daily Top 2Weekly Top 5

दादर-माटुंगा सांस्कृतिक केंद्रामध्ये रंगणार 'पाऊसवेळा'

By संजय घावरे | Updated: June 3, 2024 17:49 IST

डॉ. सुधा जोशी यांच्या सहकार्याने केंद्राच्या गोखले सभागृहात ८ जून रोजी संध्याकाळी ५:३० वाजता आयोजित करण्यात आलेला हा कार्यक्रम सर्व रसिकांसाठी खुला आहे. 

मुंबई - दादर-माटुंगा सांस्कृतिक केंद्रातर्फे `पाऊसवेळा’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. डॉ. सुधा जोशी यांच्या सहकार्याने केंद्राच्या गोखले सभागृहात ८ जून रोजी संध्याकाळी ५:३० वाजता आयोजित करण्यात आलेला हा कार्यक्रम सर्व रसिकांसाठी खुला आहे. 

पावसाआधीचा पाऊस ते परतीचा पाऊस, शैशवातला पाऊस ते प्रौढपणीचा पाऊस, पहाटेपासून मध्यरात्रीपर्य॔तचा पाऊस, आतला नि बाहेरचा पाऊस... या संकल्पनेअंतर्गत 'पाऊसवेळा' कार्यक्रम सादर होणार आहे. मराठीतील नव्या जुन्या साहित्यिकांच्या शब्दांतून झरणाऱ्या पावसाची अनंत रूपे यावेळी रसिकांना अनुभवता येतील. या कार्यक्रमाची संहिता आणि निवेदन डॅा. वंदना बोकील-कुलकर्णी यांचे आहे, तर अभिवाचन गिरीश दातार आणि गौरी देशपांडे करतील. त्यांना धनश्री गणात्रा संगीतसाथ देतील.

टॅग्स :मुंबई