Join us

दाभोलकर हत्याकांडातील दुचाकीची बीडमध्ये विल्हेवाट; एटीएसला संशय

By ऑनलाइन लोकमत | Published: September 18, 2018 5:05 AM

कर्नाटकातून तीन तर महाराष्ट्रातून चोरल्या दोन दुचाकी

मुंबई : जळगावच्या साकळीमधून अटक केलेल्या वासुदेव सूर्यवंशी (२९) आणि लीलाधर उर्फ विजय उर्फ लंबू उर्फ भैया लोधी (३२) यांनी गुन्ह्यांतील ३ दुचाकी कर्नाटक, तर २ दुचाकी महाराष्ट्रातून चोरल्या, तसेच अंनिसचे डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येदरम्यान वापरलेल्या दुचाकीची बीडमध्ये कटरच्या साहाय्याने विल्हेवाट लावल्याचा संशय एटीएसने न्यायालयात वर्तविला.३ गावठी बॉम्ब, सीडी, तसेच अन्य दस्ताऐवजांसहीत लोधी आणि सूर्यवंशीला एटीएसने बेड्या ठोकल्या होत्या. त्यांची कोठडी संपत असल्याने सोमवारी त्यांना सत्र न्यायालयात हजर करण्यात आले. नालासोपारा शस्त्रसाठ्याप्रकरणी अटक केलेल्या आरोपी शरद कळस्करकडून एटीएसने पाच दुचाकी जप्त केल्या होत्या. यातील ३ दुचाकी कर्नाटक तर २ दुचाकी दोघांनी महाराष्ट्रातून चोरी केल्याची शक्यता एटीएसने वर्तविली.धक्कादायक म्हणजे, सूर्यवंशीने अन्य एक दुचाकी बीडमध्ये कटरच्या साहाय्याने नष्ट केली. दाभोलकर हत्याकांडात वापरलेली ही दुचाकी असल्याचा संशय एटीएसला आहे. दोघेही नालासोपारा स्फोटकांप्रकरणी अटक केलेल्या आरोपींच्या संपर्कात असल्याचे तपासात स्पष्ट झाल्याचेही त्यांनी न्यायालयात सांगितले.दोघेही सराईत गुन्हेगार असून त्यांनी गेल्या ७ दिवस त्यांनी एटीएसच्या पथकाला ४० हजार किलोमीटर पळविल्याचेही या वेळी सांगितले. त्यांनी दिलेल्या माहितीवरून तपास करण्यासाठी एटीएसने, सांगली, बीड, कर्नाटकात प्रवास केला. यामुळे त्यांना तपास करण्यास पुरेसा वेळ मिळाला नाही. म्हणून एटीएसच्या दोघांच्या कोठडीत जास्तीतजास्त वाढ करण्याची मागणी केली. न्यायालयाने दोघांच्या कोठडीत २५ तारखेपर्यंत वाढ केली आहे. त्यानुसार, एटीएस दोघांकडे तपास करत आहेत.आरोपींचे वकील म्हणे, ते मोबाइल एकूण तपासातलेगेल्या पाच दिवसांत एटीएसने काहीही तपास केला नसून, फक्त सिम कार्डवरुन तपास सुरू आहे. जणू ते एका व्यक्तीची चौकशी करत असल्यासारखे दिसते. सुजीत कुमारकडे एवढ्या मोठ्या प्रमाणात मोबाइल सापडले नसून, लंकेश हत्याप्रकरणातील एकूण मोबाइलचा तो आकडा असल्याची माहिती आरोपींचे अड. संजीव पुन्हाळेकर यांनी न्यायालयात दिली.एटीएसच्या अधिकाऱ्यांनी नग्न करून मारलेगौरी लंकेश हत्याकांडातील आरोपी सुजीत कुमार आणि भरत कुरणे यांना नालासोपारा स्फोटकांप्रकरणी अटक केली. दोघांना वाढीव कोठडीसाठी सोमवारी न्यायालयात हजर करण्यात आले. या वेळी न्यायालयाने दोघांकडे काही तक्रार आहे का? असे विचारताच, कुमारने एटीएसच्या अधिकाºयांनी नग्न करून बेल्ट आणि काठीने मारहाण केल्याचा आरोप केला. तेव्हा न्यायालयात सर्वांच्याच भुवया उंचावल्या. त्याची तत्काळ डॉक्टरांकडून तपासणी केली. मात्र, त्याच्या अंगावर कुठल्याही स्वरूपाच्या जखमा आढळून आल्या नाहीत. यामुळे न्यायालयात मात्र गोंधळ निर्माण झाला होता. या गोंधळानंतर दोघेही तपासात सहकार्य करत नसल्याचे एटीएसने न्यायालयात सांगितले. त्यानुसार, त्यांच्या कोठडीत न्यायालयाने २५ तारखेपर्यंत वाढ केली.भरत कुरणेच्या फार्महाउसवर प्रशिक्षणभरत कुरणे याच्या फार्म हाउसवर अन्य आरोपींना शस्त्र चालविण्यासह बॉम्ब बनविण्याचे प्रशिक्षण देण्यात आल्याचे एटीएसच्या तपासात समोर आले.कपाळेच्या वडिलांचा मृत्यूएटीएसने स्फोटकांप्रकरणी जालना येथून गणेश कपाळेला चौकशीसाठी ताब्यात घेतले. याच धक्क्याने त्याच्या वडिलांना हृदयविकाराचा झटका येऊन त्यांचा मृत्यू झाला. प्रकरण अंगलट येण्याच्या भीतीने एटीएसने रागात कुमारला टार्गेट केले आणि त्याला मारहाण केल्याचा आरोप अ‍ॅड. संजीव पुनाळेकर यांनी केला आहे.सुजीत आणि भरणेचा सिम कार्डचा प्रवासपत्रकार गौरी लंकेश हत्येप्रकरणी कर्नाटक पोलिसांच्या विशेष पथकाने (एसआयटी)अटक केलेल्या आरोपींपैकी के. टी. नवीनकुमार याच्या नावावरील सिम कार्ड आरोपी सुजीत कुमार उर्फ प्रवीणने वापरल्याची माहिती एटीएसच्या तपासात उघड झाली. नालासोपारा स्फोटकांप्रकरणी अटक केलेल्या आरोपी वैभव राऊतच्या चौकशीतून सुजीत कुमार आणि भरत कुरणे यांची नावे समोर येताच, एटीएसने कर्नाटक एसआयटीकडून दोघांचा ताबा घेतला. १२ सप्टेंबरला त्यांना बेड्या ठोकल्या. संघाचे कार्यकर्ते असलेले दोघेही अन्य हिंदुत्ववाद्यांच्या संपर्कात होते. यातील सुजीतने गेल्या वर्षभरात ४८ मोबाइल्स वापरले. त्याच्याजवळून तीन मोबाइल आणि दोन सिम कार्ड जप्त करण्यात आले. यातील एक सिम कार्ड नवीनकुमारच्या नावावर होते.पुण्यातील सनबर्न फेस्टिवल आरोपींच्या टार्गेटवर असल्याने गेल्या वर्षीच्या २६ डिसेंबरला सुजीत कुमार हेच सिम कार्ड असलेला मोबाइल घेऊन साताºयात आला. त्यानंतर त्याने मोबाइल बंद केला. तो गोंधळेकर याच्या पुण्यातील पर्वरी परिसरातील कार्यालयात गेला. पुढे ३१ तारखेला पुन्हा साताºयात गेला आणि त्याने मोबाइल सुरू केला, तर भरत कुरणे हा २७ तारखेला साताºयात आला. त्यानेही फोन बंद केला. त्याचा मोबाइल ३० तारखेला सुरू झाल्याची माहिती एटीएसने न्यायालयात दिली.

टॅग्स :नरेंद्र दाभोलकरखून