Join us

डबेवाल्यांच्या मुलांनीही घेतला स्वच्छतेचा वसा

By admin | Updated: December 29, 2014 02:42 IST

एकीकडे राज्यात स्वच्छता अभियानाने जोर धरला असताता आता डबेवाल्यांच्या मुलांनीही हातात झाडू घेत स्वच्छतेचा विडा उचलला आहे.

मुंबई : एकीकडे राज्यात स्वच्छता अभियानाने जोर धरला असताता आता डबेवाल्यांच्या मुलांनीही हातात झाडू घेत स्वच्छतेचा विडा उचलला आहे. विक्रोळी स्टेशन पूर्व परिसरात डबेवाल्यांची व एज्युकेशन सेंटरमधील २०० मुले स्वच्छता अभियानात सहभागी झाली होती.विक्रोळी पूर्व ते टागोरनगर परिसरात दुपारी ३च्या सुमारास या अभियानाचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी ढोल-लेजीम पथकांच्या संगतीने या बच्चेकंपनीने स्वच्छतेचा संदेश नागरिकांना दिला. डबेवाल्यांची आणि मुंबईकरांची लाइफलाइन मुंबई लोकलची प्रतिकृती स्वच्छता एक्स्प्रेसच्या नावाने दिसून आली. हे या अभियानाचे खास आकर्षणदेखील ठरले. एकीकडे स्वच्छ भारत अभियानासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ९ नव्या स्वच्छता दूतांची निवड केली. त्यात डबेवाल्यांचाही सहभाग होता. या पार्श्वभूमीवर डबेवालेही स्वच्छतेचा संदेश देत आहेत. या अभियानात केवळ डबेवालेच नाहीत तर त्यांची मुलेही सहभागी झाली आहेत. डबेवाल्यांवर पीएच.डी. करणारे पवन अग्रवाल यांच्यासह अनेक मान्यवरही या वेळी उपस्थित होते. (प्रतिनिधी)