Join us
Daily Top 2Weekly Top 5

डबेवालेही मोर्चात सहभागी होणार

By admin | Updated: September 25, 2016 03:47 IST

डबेवाल्यांनी गेल्या १२६ वर्षांत काम थांबवून कधीच धरणे, बंद, आंदोलने, मोर्चांमध्ये सहभाग घेतलेला नाही. मात्र, पुण्यात होणाऱ्या मराठा मोर्चात डबेवाल्यांनी सेवा बंद करून सहभागी होण्याचा

मुंबई : डबेवाल्यांनी गेल्या १२६ वर्षांत काम थांबवून कधीच धरणे, बंद, आंदोलने, मोर्चांमध्ये सहभाग घेतलेला नाही. मात्र, पुण्यात होणाऱ्या मराठा मोर्चात डबेवाल्यांनी सेवा बंद करून सहभागी होण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला आहे.मुंबईतही मराठा क्रांती मोर्चा निघणार आहे. त्या मोर्चात सहभागी होण्यासाठी वेळप्रसंगी काम बंद करून सहभागी होण्याचा निर्णय मुंबईच्या डबेवाल्यांनी घेतला आहे. यात डबेवाले संघटनेचे अध्यक्ष भाऊसाहेब करवंदे, माजी अध्यक्ष यमनाजी घुले, सोपान मरे, सबाजी मेदगे, बबनदादा वाळंज यांच्या मार्गदर्शनाखाली मुंबईचे डबेवाले मोर्चात सहभागी होतील.मुंबईचे डबेवाले हे मावळ मराठा आहेत. प्रगती, विकास, शिक्षण यांच्या संधी मराठ्यांना नाकारल्या जात आहेत. त्या संधी मराठ्यांना मिळण्यासाठी ‘मराठा आरक्षण’ मिळालेच पाहिजे, अशी डबेवाल्यांचीही भावना आहे. मोर्चात डबेवाल्यांसह नातेवाईक, आप्त, मित्रपरिवार सहभागी होतील, असे डबेवाले संघटनेचे प्रवक्ते सुभाष तळेकर यांनी सांगितले. (प्रतिनिधी)