Join us

डबेवाले सुटीवर!

By admin | Updated: November 17, 2014 01:13 IST

एकादशीनिमित्त मुंबईचे डबेवाले माऊलीचे दर्शन घेण्यासाठी आळंदीला निघाले आहेत. त्यामुळे डबेवाले एक दिवसाच्या सुटीवर जाणार आहेत.

मुंबई : एकादशीनिमित्त मुंबईचे डबेवाले माऊलीचे दर्शन घेण्यासाठी आळंदीला निघाले आहेत. त्यामुळे डबेवाले एक दिवसाच्या सुटीवर जाणार आहेत. मात्र १८ नोव्हेंबर रोजी कार्तिकी एकादशीला डबेवाले कामावर असून दुसऱ्या दिवशी १९ नोव्हेंबर रोजी डबे पोहोचविण्याची सेवा पूर्ण बंद राहिल.महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून दिंड्या निघाल्या आहेत. मुंबईच्या डबेवाल्यांनाही विठ्ठलाच्या दर्शनाची आस लागली आहे. त्यामुळे ते आळंदीला निघाले आहेत. दरम्यान गुरुवारी २० नोव्हेंबर, रोजी डबे पोहोचविण्याची सेवा नेहमीप्रमाणे सुरु असेल, असे मुंबई जेवण डबे वाहतूक मंडळाचे अध्यक्ष भाऊसाहेब करवंदे यांनी कळविले आहे. (प्रतिनिधी)