Join us

महिला कारचालकाची दबंगगिरी

By admin | Updated: May 6, 2017 04:21 IST

नाकाबंदीदरम्यान चुकीच्या दिशेने गाडी चालविणाऱ्या महिला कारचालकाला थांबविल्याच्या रागात तिने महिला पोलिसाला धक्काबुकी

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : नाकाबंदीदरम्यान चुकीच्या दिशेने गाडी चालविणाऱ्या महिला कारचालकाला थांबविल्याच्या रागात तिने महिला पोलिसाला धक्काबुकी करत पळ काढला. तिच्या दबंगगिरीचा व्हिडीओ व्हायरल झाला असून या प्रकरणी पवई पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे. या कारचालक महिलेला थांबवून वाहतुकीचे नियम का तोडले? अशी विचारणा वाहतूक पोलिसांनी करताच तिने पोलिसांनाच उलटप्रश्न करण्यास सुरुवात केली. कारच्या दरवाज्याजवळ उभे राहून प्रश्न विचारणाऱ्या महिला पोलिसाला ढकलून देत पळ काढला. बुधवारी पवईत ही घटना घडली. दादागिरी करून पळून गेलेल्या महिलेचा शोध सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.