Join us
Daily Top 2Weekly Top 5

डी. वाय. पाटील यांच्या सत्कारानिमित्त सर्वपक्षीय नेते एकाच व्यासपीठावर येणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 21, 2018 06:19 IST

माजी राज्यपाल डॉ. डी. वाय. पाटील यांच्या ८३ व्या वाढदिवशी सोमवारी, २२ आॅक्टोबरला दुपारी तीन वाजता वरळीच्या नेहरू विज्ञान केंद्र सभागृहात सर्वपक्षीय नेते एकाच व्यासपीठावर दिसतील

मुंबई : माजी राज्यपाल डॉ. डी. वाय. पाटील यांच्या ८३ व्या वाढदिवशी सोमवारी, २२ आॅक्टोबरला दुपारी तीन वाजता वरळीच्या नेहरू विज्ञान केंद्र सभागृहात सर्वपक्षीय नेते एकाच व्यासपीठावर दिसतील, अशी माहिती पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील सत्कार समितीचे अध्यक्ष सुशीलकुमार शिंदे यांनी दिली.मुंबई मराठी पत्रकार संघात शनिवारी झालेल्या पत्रकार परिषदेत बोलताना शिंदे म्हणाले की, राष्ट्रवादीचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांना या कार्यक्रमाचे अध्यक्षपद दिले आहे. त्यांच्यासह माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील, माजी पंतप्रधान एच. डी. देवेगौडा, केंद्रीय नौकानयन मंत्री नितीन गडकरी, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, कोल्हापूरचे छत्रपती शाहू महाराज यांच्यासह सर्वपक्षीय नेत्यांनी कार्यक्रमात हजर राहण्याचे आश्वासित केले आहे.