Join us
Daily Top 2Weekly Top 5

कळंबोली येथे सिलिंडरचा भडका

By admin | Updated: February 8, 2015 22:31 IST

कळंबोली सेक्टर - २ मध्ये केएल - ४ मधील बिल्डिंग क्र मांक ९५ याठिकाणी राहणाऱ्या चंद्रशेखर गुप्ता यांच्या घरात रविवारी सकाळी ११ च्या सुमारास

पनवेल : कळंबोली सेक्टर - २ मध्ये केएल - ४ मधील बिल्डिंग क्र मांक ९५ याठिकाणी राहणाऱ्या चंद्रशेखर गुप्ता यांच्या घरात रविवारी सकाळी ११ च्या सुमारास त्यांची पत्नी स्वयंपाक बनवत असताना स्वयंपाकघरातील गॅस सिलिंडरमध्ये बिघाड झाल्याने त्याचा भडका झाला. यामुळे घरात अचानक आग लागल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. दरम्यान कळंबोली अग्निशमन दलाला घटनेची माहिती मिळताच अग्निशमन बंब व पाच कर्मचाऱ्यांनी लागलेली आग विझवली. या घटनेत जीवितहानी झाली नसून घरातील काही साहित्याचे मात्र यात नुकसान झाले आहे. ही घटना घडतेवेळी घरमालक चंद्रशेखर गुप्ता व त्यांच्या पत्नी घरीच होत्या. कळंबोली अग्निशमन दलाचे डी. एन . पाटील, पी. जी. ठाकूर, ए. बी. खानावकर, ए. एम. गाडेकर आदी अधिकारी घटनास्थळी उपस्थित होते. (प्रतिनिधी)