Join us
Daily Top 2Weekly Top 5

सिलिंडर स्फोटाचा तिसरा बळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 25, 2015 01:52 IST

गेल्या आठवड्यात विक्रोळीच्या पार्कसाईट येथे झालेल्या सिलिंडर स्फोटातील अजून एका जखमीचा शनिवारी कस्तुरबा रुग्णालयात मृत्यू झाला. सिलिंडर स्फोटातील हा तिसरा बळी

मुंबई: गेल्या आठवड्यात विक्रोळीच्या पार्कसाईट येथे झालेल्या सिलिंडर स्फोटातील अजून एका जखमीचा शनिवारी कस्तुरबा रुग्णालयात मृत्यू झाला. सिलिंडर स्फोटातील हा तिसरा बळी आहे. संतोष शिंदे (३४) हा या स्फोटात ६० टक्के भाजला होता. याच्यावर कस्तुरबा रुग्णालयात उपचार सुरू होते. शनिवारी सकाळी त्याचा रुग्णालयात मृत्यू झाला. कस्तुरबा रुग्णालयात उपचार घेत असलेल्या विमल यांची प्रकृती अजूनही गंभीर आहे. या स्फोटात त्या ८० टक्के भाजल्या आहेत. त्याची दोन मुले सौरव आणि अनिकेतही या स्फोटात जखमी झाले होते. त्या दोघांनाही शनिवारी दुपारी राजावाडी रुग्णालयातून कस्तुरबा रुग्णालयात हलवण्यात आले. त्या दोघांची प्रकृती स्थिर आहे.