Join us  

मान्सूनच्या तोंडावर चक्रीवादळ येणार; चक्रीवादळ रोधक यंत्रणा उभारण्यासाठी अभ्यास सुरू

By ऑनलाइन लोकमत | Published: May 30, 2021 6:37 AM

चक्रीवादळाचा मुकाबला करण्यासाठी महावितरण, महापारेषण यांच्यासह मुंबईतील बेस्ट, अदानी, टाटा यांच्यासारख्या संस्थांचे प्रतिनिधी यांचा समावेश असलेला एक कोअर गट स्थापन करण्यात आला आहे.

मुंबई : मान्सूनच्या तोंडावर चक्रीवादळ येणार हे गृहीत धरून तसेच चक्रीवादळात वीजपुरवठा खंडित होऊ नये म्हणून चक्रीवादळरोधक वीज पायाभूत सुविधा कशा उभारता येतील, याचा अभ्यास सुरू करण्यात आला आहे. चक्रीवादळाचा मुकाबला करण्यासाठी महावितरण, महापारेषण यांच्यासह मुंबईतील बेस्ट, अदानी, टाटा यांच्यासारख्या संस्थांचे प्रतिनिधी यांचा समावेश असलेला एक कोअर गट स्थापन करण्यात आला आहे. याशिवाय २४ तास सक्रिय असलेला एक नियंत्रण कक्षही महावितरणच्या मुख्यालयात स्थापन करण्यात आला आहे.जागतिक वातावरणात होणारे बदल लक्षात घेता दरवर्षी मान्सूनच्या तोंडावर चक्रीवादळ येणार, हे गृहीत धरून नियोजन करा. वादळामुळे कमी नुकसान होईल. वीजपुरवठा तत्काळ पूर्ववत करता येईल, यासाठी कायमस्वरूपी नियोजन, आदर्श कार्यप्रणाली तयार करा, दरवर्षी पाऊस आल्यावर अनेक ठिकाणी वीज जाते. हे टाळण्यासाठी पावसाळी पूर्वतयारीचा भाग म्हणून पाऊस झाल्यावरही वीजपुरवठा कायम राहावा, यासाठी आपत्कालीन योजना तयार करा,  असे निर्देश देण्यात आले आहेत. एखाद्या ठिकाणी वीज गेल्यास तिथे वीजपुरवठा करण्याचे अन्य पर्याय काय असतील, याचाही आराखडा तयार करा, अशा सूचनाही करण्यात आल्या आहेत.९९.९६ टक्के भागात वीज सुरळीतnमुंबई : तौक्ते चक्रीवादळाने सिंधुदुर्ग, रत्नागिरी, पालघर, रायगड, पुणे व कोल्हापूर जिल्ह्यांमधील वीज यंत्रणेला तडाखा दिला. n२०१ उपकेंद्र, १३४२ उच्चदाब वीजवाहिन्या व ३६ हजार ३० रोहित्रांचा वीजपुरवठा खंडित झाल्यामुळे ५,५७५ गावांमधील वीजपुरवठा विस्कळीत झाला हाेता, तर ३५ लाख ८७ हजार २६१ ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित झाला होता. महावितरणने वीज यंत्रणेची उभारणी, दुरुस्ती करून ३५ लाख ८७ हजार म्हणजे ९९.९६ टक्के वीजपुरवठा सुरळीत केला. 

टॅग्स :चक्रीवादळ