Join us

युतींबाबत उत्सुकता आणि कुरघोडयाही

By admin | Updated: September 26, 2016 02:45 IST

मुंबई महापालिकेच्या निवडणुकीचे पडघम वाजण्यास सुरुवात झाली आहे. महापालिकेतील प्रत्येक राजकीय पक्षाने निवडणूक लढवण्यासाठी कंबर कसली आहे.

सचिन लुंगसे,  मुंबईमुंबई महापालिकेच्या निवडणुकीचे पडघम वाजण्यास सुरुवात झाली आहे. महापालिकेतील प्रत्येक राजकीय पक्षाने निवडणूक लढवण्यासाठी कंबर कसली आहे. भाजपा-शिवसेना आणि काँग्रेस-राष्ट्रवादीच्या युतीबाबत मुंबईकरांची उत्सुकता तर शिगेला पोहोचली आहे. दुसरीकडे सत्ताधारी शिवसेना आणि भाजपाची विविध कार्यक्रमांच्या निमित्ताने एकमेकांवर कुरघोडी सुरू आहे. तर दुसरीकडे जिल्हाधिकारी कार्यालयासह महापालिका प्रशासनाने निवडणुकीची पूर्वतयारी सुरू केली आहे. राजकीय पक्षांसह प्रशासनाचीही १८ वर्षे पूर्ण करणाऱ्या मतदारांवर मदार असल्याने निवडणुकीची रंगत आणखीच वाढणार आहे.मुंबई महापालिका आणि जिल्हाधिकारी कार्यालयाने महापालिका निवडणुकीच्या अनुषंगाने जोरदार तयारी सुरू केली आहे. महापालिका प्रशासनाच्या नव्या प्रभाग रचनेसाठी बैठका सुरू आहेत. जिल्हाधिकारी कार्यालयाने नव्या मतदारांच्या जागृतीसाठी जोरदार मोहीम हाती घेतली आहे. या अनुषंगाने महापालिका आणि जिल्हाधिकारी कार्यालयाची आढावा बैठक नुकतीच झाली. या बैठकीत नव्या मतदारांवर लक्ष केंद्रित करण्यात आले. बैठकीच्या वृत्तानुसार, महापालिका सार्वत्रिक निवडणूक २०१७च्या अनुषंगाने नवीन मतदारांची जास्तीतजास्त नोंदणी व्हावी यासाठी १४ आॅक्टोबरपर्यंत मतदार नोंदणी अभियान महापालिकेतर्फे राबविण्यात येत आहे. या अभियानाच्या यशस्वीतेसाठी राज्य निवडणूक आयोग, महापालिका आणि मुंबई शहर आणि उपनगरातील निवडणूक निर्णय अधिकारी काम करीत आहेत.जिल्हाधिकारी कार्यालय आणि महापालिकेच्या कामकाजानुसार, ज्या मतदारांची नावे यापूर्वीच्या मतदार यादीमध्ये होती, परंतु आताच्या मतदार यादीमध्ये नाहीत अशा गहाळ झालेल्या नावांची शहानिशा करून संबंधित मतदार यादीत त्याच्या नावाची नोंद करणे, त्याचप्रमाणे वाढलेल्या लोकसंख्येप्रमाणे मतदार नोंदणी होण्यासाठी सर्व संबंधित अधिकाऱ्यांनी आपल्या विभागांमध्ये त्यादृष्टीने प्रयत्न करणे; यांचा समावेश आहे. या अंतर्गत मुंबई शहर व उपनगर जिल्हाधिकारी कार्यालय व महापालिका यांच्यामध्ये योग्य तो समन्वय ठेवून ही मोहीम यशस्वीरीत्या राबविण्यात येणार आहे. गेल्या लोकसभेच्या आणि विधानसभेच्या निवडणुकांमध्येही तरुण मतदारांचे मतदान महत्त्वपूर्ण ठरले होते. नव्या तंत्रज्ञानाच्या मदतीने या मतदारांना आकृष्ट करणेही तुलनेने सोपे होते. त्यामुळे लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांप्रमाणेच मुंबई महापालिका निवडणुकीतही तरुणाईचा कल अधिक महत्त्वाचा ठरणार आहे. त्यामुळे पहिल्यांदा मतदान करणाऱ्यांसह एकविशी-बाविशीतील तरुणांना आकृष्ट करण्याकडे सध्या राजकीय पक्षांचा कल दिसून येतो. त्यामुळे नव्या मतदारांच्या नोंदणीसाठी राजकीय पक्षांनीही विविध मोहिमा सध्या वॉर्ड स्तरावर उघडलेल्या आहेत. एक आवाहन१ जानेवारी, २०१७ रोजी ज्यांच्या वयाची १८ वर्षे पूर्ण होणार आहेत अशा नवीन मतदारांनी नावांची नोंदणी करावी, असे आवाहन महापालिका आणि जिल्हाधिकारी कार्यालयाकडून करण्यात आले आहे.जनजागृती का?प्रत्येक निवडणुकीला जनजागृती करूनही मतदान सरासरी ५० टक्केच आहे़ तसेच मतदारांची संख्याही दहा लाखांनी घटली असल्याचे उजेडात आले आहे़ त्यामुळे महापालिका निवडणुकीत तरुण मतदारांना आकर्षित करण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे़ त्यानुसार मतदार नोंदणीचा कार्यक्रम महापालिकेने आखला आहे़५० टक्केच मुंबईकर करतात मतदान१ कोटी २४ लाख लोकसंख्या असलेल्या मुंबईत ६२ टक्के मतदान होणे अपेक्षित आहे़ मात्र प्रत्येक महापालिका निवडणुकीत मतदानाचा आकडा ५० टक्क्यांवरच अडकला आहे़ मतदारांची यादी अद्ययावत केली असता २०१२नंतर १ कोटी २ लाख ८६ हजार ५७९ मतदारांची संख्येत घट झाली आहे. मुंबईसह उपनगरांत सध्या ९१ लाख ८७ हजार २७८ मतदार उरले आहेत़ तरुण-तरुणींनो मतदान करामुंबई महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणूक २०१७मध्ये अधिकाधिक तरुण-तरुणींनी मतदान करता यावे; आणि यासाठी प्रथमत: मतदारांना नोंदणी करता यावी म्हणून मुंबई महापालिका प्रशासन सज्ज झाले आहे. याकरिता प्रशासनाने घोषवाक्ये तयार केली आहेत. या माध्यमातून मतदार नोंदणी जनजागृती अभियान राबवण्यात येत आहे.मतदार नोंदणीसाठीची हिंदी घोषवाक्येमुंबई है हमारी शान, मतदार होना यही है आपकी पहचानसबसे प्यारा मुंबई शहर, मतदार होना यही है लोकशाही का जागरमतदार बनना है राष्ट्रीय कर्तव्य, चलो पुरा करे अपने कर्तव्यचले शान मे, मतदान नोंदणी अभियानमेएक कदम राष्ट्रीत्वका, नोंदणी करके मतदार बनने काप्रत्येक मतात असते ताकद परिवर्तनाची, चला तर मग करू या नोंदणी मतदार होण्याचीएकेका मताने बनतो लोकशाहीचा सागर, सुरू करू या मतदान नोंदणीचा जागरआॅक्टोबरपर्यंत सुरू असलेल्या राष्ट्रीय मतदार यादी शुद्धीकरण मोहीम २०१६चा लाभ घ्या, मतदार यादीत आपले नाव तपासून घ्या.आपले मत, आपली ताकदआपले एक मत बदल घडवू शकतेमतदार म्हणून नाव नोंदवा, घटनादत्त मतदान अधिकार बजावामतदार नोंदणी करणे हे एक राष्ट्रीय कर्तव्य आहे.सक्षम युवापिढी, सक्षम लोकशाहीस्मार्ट मतदार, स्मार्ट मुंबईसक्षम मतदार, समर्थ भारतसक्षम युवापिढी, समर्थ लोकशाही