Join us  

कुटील रणनिती तर नाही ना? निवडणुकांच्या तारखांना पृथ्वीराज चव्हाणांचाही आक्षेप

By महेश गलांडे | Published: February 27, 2021 4:22 PM

केंद्रीय निवडणूक आयोगाकडून देशातील 5 राज्यांच्या विधानसभा निवडणुकांची घोषणा झाल्यानंतर पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी निवडणूक आयोगावरच प्रहार केला.

मुंबई - देशात होणाऱ्या आगामी 5 राज्यांच्या विधानसभा निवडणुकीसाठी निवडणूक आयोगाने तारखांची घोषणा केली. आगामी 5 राज्यांच्या विधानसभा निवडणुकांत पुदूचेरी; आसाम ;पश्चिम बंगाल, केरळ आणि तामिळनाडूया राज्यांमध्ये निवडणुकांची रणधुमाळी पहायला मिळणार आहे. त्यासाठी, भाजपा, काँग्रेस आणि संबंधित राज्यातील स्थानिक पक्षांनी मोर्चेबांधणीला सुरुवात केलीय. त्यासंदर्भात निवडणूक आयोगाने पत्रकार परिषद घेऊन माहिती दिली. त्यानंतर, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी निवडणुकांच्या तारखांवर आक्षेप घेत, आयोगाला प्रश्न विचारले आहेत. आता, काँग्रेस नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनीही निवडणुकांच्या तारखांवरुन प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. Assam, Kerala, Tamil Nadu, Puducherry and West Bengal State Assembly election 2021 full schedule

केंद्रीय निवडणूक आयोगाकडून देशातील 5 राज्यांच्या विधानसभा निवडणुकांची घोषणा झाल्यानंतर पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी निवडणूक आयोगावरच प्रहार केला. त्यानंतर, पृथ्वीराज चव्हाण यांनीही निवडणुकांच्या घोषणांमधील तारखा पाहता, हा कुठल्या कुटील राजकारणाचा डाव तर नाही नाही, असा प्रश्न उपस्थित केला आहे. जर केरळ 140, तामिळनाडू 234, पद्दुचेरी 30 म्हणजे एकूण (404) जागांवर एकाच दिवसांत, पहिल्याच टप्प्यात मतदान घेता येत आहे. तर, आसाम आणि पश्चिम बंगालसाठी 8 टप्प्यांत मतदान का?. आसाम 126, पश्चिम बंगाल 294 म्हणजे एकूण (420) जागांसाठी 7 ते 8 टप्प्यात मतदान का, असा प्रश्न चव्हाण यांनी उपस्थित केला आहे. या पाठिमागे काही कुटील रणनिती तर नाही ना? असेही चव्हाण यांनी म्हटलंय. 

ममता बॅनर्जींचा आक्षेप

निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या तारखांवर ममता बॅनर्जींनी आक्षेप घेतला आहे. भाजपाच्या सोयीनुसार निवडणुकांच्या तारखा ठरविण्यात आल्याचा आरोप त्यांनी पत्रकार परिषद घेऊन केलाय. यंदा पश्चिम बंगालमध्ये 8 टप्प्यांत मतदान होत आहे. पण, एकाच जिल्ह्यात तीन टप्प्यांत का मतदान घेण्यात येत आहे? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केलाय. तसेच, बंगालमध्ये बंगालीच राज्य करणार, बाहेरच्यांना आम्ही घुसू देणार नाही, असेही त्यांनी म्हटलंय. निवडणूक आयोगाने पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांच्या दौऱ्यांना अनुसरुन तारखा जाहीर केल्या आहेत. भाजपाने जे सांगितलं, तेच निवडणूक आयोगाने केलंय. गृहमंत्र्यानी आपल्या ताकदीचा दुरुपयोग केला आहे. पण, आता खेळ सुरू झालाय, आम्ही खेळू आणि जिंकूच. भाजपाला नक्कीच पराभूत करू, असा विश्वासही ममता बॅनर्जींनी व्यक्त केलाय. 

कोरोनाचा विचार करुन निवडणुका

कोरोना कालावधीत राज्यसभेच्या 18 जागांसाठी निवडणूक घेणं आव्हान होतं. त्यानंतर, बिहार विधानसभा निवडणुकांच्या मतदानाची मोठी प्रक्रिया आपण पार पाडली. त्यामुळे, आताही त्याच पद्धतीने 5 राज्यांच्या निवडणुकांची प्रक्रिया पार पडणार आहे. मतदारांच्या सुरक्षेची विशेष काळजी घेऊ. कोरोनामुळे नवी आव्हानं आहेत, नियम पाळून प्रक्रिया पूर्ण करू, असे निवडणूक आयुक्त सुनील अरोरा यांनी म्हटलं. तसेच, आसाममधील १२६, तामिळनाडू २३४, पश्चिम बंगालमध्ये २९४, केरळ १४० आणि पद्दुचेरीत ३० जागांसाठी विधानसभा निवडणूक होणार आहे.  

पश्चिम बंगालमध्ये आठ टप्प्यात विधानसभा निवडणूक

पहिला टप्पा - 27 मार्च मतदानदुसरा टप्पा - 1 एप्रिल मतदानतिसरा टप्पा - 6 एप्रिल मतदानचौथा टप्पा - 10 एप्रिल मतदानपाचवा टप्पा - 17 एप्रिल मतदानसहावा टप्पा- 22 एप्रिल मतदानसातवा टप्पा-  26एप्रिल मतदानआठवा टप्पा- 29 एप्रिल मतदान

निकाल - 2 मे रोजी

टॅग्स :पृथ्वीराज चव्हाणनिवडणूकभारतीय निवडणूक आयोगकाँग्रेसपश्चिम बंगालपश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक २०२१