लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : राज्य शासनाने कोरोनामुळे दहीहंडी उत्सवाला बंदी घातल्यामुळे शहरामध्ये शुकशुकाट होता. काही सोसायट्यांमध्ये अगदीच साध्या पद्धतीने दहीहंडी उत्सव साजरा करण्यात आला. शासनाच्या निर्णयामुळे अनेक पथकांनी सार्वजनिकपणे दहीहंडी उत्सव साजरा केला नसला, तरी आपली संस्कृती जपण्यासाठी साध्या पद्धतीने उत्सव साजरा केला.
जय जवान गोविंदा पथकाचे समनव्यक विजय निकम म्हणाले की, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सरकारने दहीहंडी उत्सवावर बंदी घातलेली आहे. मात्र आम्ही अत्यंत साध्या पद्धतीने उत्सव साजरा केला. तर विजय सोलंकी म्हणाले की, आम्ही आपण आपली संस्कृती जपायला हवी, यासाठी हा उत्सव साधेपणाने साजरा केला. तर नीलेश वाघेला म्हणाले की, सध्या दहीहंडी उत्सवावर बंधने आहेत मात्र आम्ही कोरोनाचे सर्व नियम पाळूनच हा उत्सव साजरा केला.