Join us
Daily Top 2Weekly Top 5

सीटीईटी परीक्षेच्या तारखा जाहीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 19, 2021 04:07 IST

केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षेच्या (सीटीईटी) तारखा जाहीर केल्या आहेत. सीटीईटी परीक्षेचे आयोजन संगणकीकृत पद्धतीने (कॉम्प्युटर ...

केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षेच्या (सीटीईटी) तारखा जाहीर केल्या आहेत. सीटीईटी परीक्षेचे आयोजन संगणकीकृत पद्धतीने (कॉम्प्युटर आधारित टेस्ट) १६ डिसेंबर २०२१ ते १३ जानेवारी २०२२ पर्यंत केले जाणार आहे. संपूर्ण देशभरात २० भाषांमध्ये ही परीक्षा आयोजित केली जाणार आहे. ऑनलाईन अर्ज प्रक्रिया २० सप्टेंबर २०२१ पासून सुरू होणार आहे. ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम मुदत १९ ऑक्टोबर २०२१ आहे आणि २० ऑक्टोबर २०२१ रोजी दुपारी ३.३० वाजेपर्यंत शुल्क भरायचे आहे.

------------

सीबीएसईच्या विद्यार्थ्यांना दिलासा

मुंबई

इयत्ता बारावीमध्ये उपयोजित गणित हा विषय घेऊन उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना पदवी प्रवेशासाठी नियमित गणित विषयानुसार गुण गृहित धरून प्रवेश द्यावा, अशी सूचना विद्यापीठ अनुदान आयोगाने काढली आहे. यामुळे सीबीएसईच्या हजारो विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला आहे.