Join us  

देशात सीएसएमटी स्थानक सर्वात ‘स्वच्छ ठिकाण’

By ऑनलाइन लोकमत | Published: September 04, 2019 3:05 AM

६ सप्टेंबर २०१९ रोजी दिल्ली येथील विज्ञान भवन येथे ‘स्वच्छ महोत्सव’ दरम्यान छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसला देशातील ‘सर्वश्रेष्ठ स्वच्छ प्रतिष्ठित ठिकाण’ म्हणून घोषित केले जाईल.

मुंबई : छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवरील साफसफाई, प्रतीकांची दृश्यमानता अशा अनेक चाचण्यांवर सीएसएमटी देशातील ‘सर्वश्रेष्ठ स्वच्छ प्रतिष्ठित ठिकाण’ ठरले आहे. जल शक्ती मंत्रालय, पेज जल आणि स्वच्छता मंत्रालयाद्वारे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसला देशातील सर्वाधिक स्वच्छ ठिकाण म्हणून घोषित करण्यात आले आहे.

६ सप्टेंबर २०१९ रोजी दिल्ली येथील विज्ञान भवन येथे ‘स्वच्छ महोत्सव’ दरम्यान छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसला देशातील ‘सर्वश्रेष्ठ स्वच्छ प्रतिष्ठित ठिकाण’ म्हणून घोषित केले जाईल. जल, स्वच्छता मंत्रालय, जल शक्ती मंत्रालय, आवास मंत्रालय आणि शहरी कामकाज मंत्रालय, सांस्कृतिक मंत्रालय, पर्यटन मंत्रालय आणि युनेस्को यांच्या वतीनेही स्पर्धाचे आयोजन होते. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसला ‘सर्वश्रेष्ठ स्वच्छ प्रतिष्ठित ठिकाण’ म्हणून कायम ठेवण्यासाठी मध्य रेल्वेचे महाप्रबंधक ए. के. गुप्ता यांनी मध्य रेल्वेच्या टीमला शुभेच्छा दिल्या.

स्वच्छ भारत मिशन अंतर्गत देशातील स्वच्छ ठिकाणांमध्ये स्पर्धा घेण्यात आली आहे. यापैकी ३० ठिकाणांना तीन टप्प्यांत विभाजित केले आहे. यामध्ये वैष्णोदेवी, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, ताजमहल, तिरुपती मंदिर, स्वर्ण मंदिर, मणिकर्णिका घाट, अजमेर शरीफ दर्गा, मीनाक्षी मंदिर, कामाख्य मंदिर, जगन्नाथ पुरी हे होते. दुसऱ्या टप्प्यात यमुनोत्री, महाकालेश्वर मंदिर, चारमीनार, सेंट्र फ्रान्सिस आॅफ अस्सी का कॉन्वेंट आणि चर्च, कलदी, गोम्मटेश्वर, बैद्यनाथधाम, गया तीर्थ आणि सोमनाथ मंदिर हे होते.जगभरातील १० आश्चर्यकारक स्थानकांच्या यादीतच्छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) रेल्वे स्थानक जगातील टॉप १० आश्चर्यकारक स्थानकांपैकी एक ठरला आहे. ‘वंडर्सलिस्ट’ या संकेतस्थळाने जगातील दहा आश्चर्यकारक रेल्वे स्थानकांची यादी जाहीर केली आहे. यामध्ये सीएसएमटी स्थानक दुसºया क्रमांकावर असून याची माहिती मध्य रेल्वेने टिष्ट्वटरद्वारे दिली आहे.

च्‘वंडर्सलिस्ट’ या संकेतस्थळावरून न्यूयॉर्कमधील ग्रँड सेंट्रल टर्मिनस सर्वात आश्चर्यकारक असून पहिल्या क्रमांकावर आहे. त्यानंतर मुंबईमधील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, लंडनचे सेंट पँक्रास इंटरनॅशल स्थानक तिसºया क्रमांकावर आहे. च्छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस या रेल्वे स्थानकाला १३२ वर्षे पूर्ण झाली आहेत. २० मे १८८८ साली या वास्तूची उभारणी करण्यात आली. २००४ साली युनेस्कोच्यावतीने या वास्तू वैभवाला ‘जागतिक वारसा’ म्हणून घोषित करण्यात आले. हे रेल्वे स्थानक देश-विदेशातील पर्यटकांचे आकर्षणाचे केंद्र बनल्यामुळे, २०१६ साली देशातील १० महत्त्वाच्या प्रेक्षणीय स्थळांमध्ये यास निवडण्यात आले. देशातील सर्वाधिक वर्दळीचे स्थानक असून दररोड ४० ते ४५ लाख प्रवासी येथून प्रवास करतात.जगातील १० आश्चर्यकारकरेल्वे स्थानकांची यादीच्ग्रँड सेंट्रल टर्मिनस, न्यूयॉर्कच्छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, मुंबईच्सेंट पँक्रास इंटरनॅशनल, लंडनच्अटोचा स्टेशन, माद्रिदच्अँटवर्प सेंट्रल, अँटवर्पच्गारे डू नॉर्ड, पॅरिसच्सिरकेसी स्टेशन, इस्तांबुलच्सीएफएम रेल्वे स्टेशन, मापुटोच्कानाझ्वा स्टेशन, कानाझ्वाच्क्वालालंपूर रेल्वे स्टेशन, मलेशिया

टॅग्स :मुंबईछत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस