मुंबई : मध्य रेल्वे मार्गावरील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस इमारतीला झळाळी देण्याचे काम सुरू आहे. स्थानकाचा परिसर उजळविण्यात येत असल्याने सीएसएमटी स्थानक बघण्यासाठी प्रवाशांची गर्दी वाढत आहे.मुंबईतील उष्ण आणि दमट हवामानामुळे वास्तूच्या दगडावर काळे डाग पडत आहेत. हे डाग शास्त्रशुद्ध पद्धतीने काढण्याचे काम सुरू आहे. यामध्ये हेरिटेज वास्तूच्या मुख्य बांधकामाला कोणताही धोका पोहविला जात नाही. इमारतीला नवीन झळाळी देण्यासाठी काम सुरू आहे. यासाठी ५१ करोड रुपये खर्च करण्यात आला आहे. नवीन रूपातील वास्तू पर्यटकांसाठी आकर्षित असेल, असे मध्य रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. इमारतीचा मुख्य गाभ्यात छोट्या-छोट्या नक्षीकामाचे सौंदर्य वाढविण्यात येत आहे.सीएसएमटी रेल्वे स्थानकाठिकाणी गॅलरी खुली केली आहे. त्यामुळे स्थानक उजळले आहे. सीएसएमटीच्या मुख्य भागात छप्पर बसविण्यात येत आहे. सीएसएमटी स्थानकावरील फलाट क्रमांक ३ आणि ४ वर लाद्या बसविण्यात येत आहेत. त्यामुळे प्रवाशांना लोकलमधून चढणे आणि उतरणे सोयीस्कर होणार आहे.
सीएसएमटीला मिळत आहे नवा लूक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 30, 2019 01:44 IST
मध्य रेल्वे मार्गावरील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस इमारतीला झळाळी देण्याचे काम सुरू आहे.
सीएसएमटीला मिळत आहे नवा लूक
{{#config.logo.enabled}} {{/config.logo.enabled}}
{{/allowed}}