ठाणे : बांधकाम तोडू नये यासाठी मिरा-भार्इंदर महापालिकेतील अतिक्रमण विभागाचे सहाय्यक आयुक्त चंद्रकांत बोरसे याला ठाणे लाचलुचपत विभागाने ५० हजारांची लाच घेताना रंगेहाथ पकडले. ही कारवाई सोमवारी रात्री ठाण्यातील पातलीपाडा येथे केली.मिरा - भार्इंदरमधील तक्रारदारांच्या जागेवरील बांधकाम तोडू नये, म्हणून बोरसे याने पन्नास हजारांची मागणी केली होती. याचदरम्यान, तक्रारदाराने ठाणे लाचलुचपत विभागात तक्रार केल्यानंतर सोमवारी सापळा रचून त्याला अटक के ली. याप्रकरणी कासारवडवली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस उपअधीक्षक अंजली आंधळे या करीत आहेत.
लाचखोर साहाय्यक आयुक्तास अटक
By admin | Updated: September 9, 2015 01:03 IST