Join us

अत्यावश्यक दुकानांच्या वेळेत कपातीमुळे गर्दी वाढेल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 21, 2021 04:07 IST

दुकानदार संघटनालोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : राज्य सरकारने अत्यावश्यक सेवेतील दुकाने ७ ते ११ यावेळेत सुरू ठेवण्यास ...

दुकानदार संघटना

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : राज्य सरकारने अत्यावश्यक सेवेतील दुकाने ७ ते ११ यावेळेत सुरू ठेवण्यास परवानगी दिली आहे. मात्र केवळ चार तास दुकाने सुरू राहिल्यास गर्दी वाढेल, असे मत फेडरेशन ऑफ रिटेल ट्रेडर्स वेल्फेअर असोसिएशनने मांडले.

फेडरेशन ऑफ रिटेल ट्रेडर्स वेल्फेअर असोसिएशनचे अध्यक्ष वीरेन शाह यांनी म्हटले की, चार तास हा खूप कमी कालावधी आहे. या कमी वेळेत दुकाने सुरू राहिल्यास गर्दी वाढेल. तसेच चार तासांचा कालावधी असल्याने अनेक कर्मचाऱ्यांना कामावर पोहोचता येणार नाही. चार तासांसाठी कर्मचारी नेमणे दुकानदारांना परवडणारे नाही. त्यामध्ये मिळणाऱ्या उत्पन्नातून कामगारांचा खर्च, दुकानाचे भाडे देणेही कठीण होते. त्यामुळे सरकारने या वेळ मर्यादेचा पुनर्विचार करावा.