Join us

अंगारकीनिमित्त सिद्धिविनायक मंदिरात भाविकांची गर्दी

By admin | Updated: December 9, 2014 01:07 IST

अंगारकी चतुर्थीनिमित्त गणोशभक्तांनी ठिकठिकाणच्या गणोश मंदिरांत दर्शनासाठी गर्दी केली आहे. सोमवारी रात्रीपासून सिद्धिविनायक मंदिरामध्येही भक्तांच्या रांगा लागल्या आहेत.

मुंबई : अंगारकी चतुर्थीनिमित्त  गणोशभक्तांनी ठिकठिकाणच्या गणोश मंदिरांत दर्शनासाठी गर्दी केली आहे. सोमवारी रात्रीपासून सिद्धिविनायक मंदिरामध्येही भक्तांच्या रांगा लागल्या आहेत.
अंगारकी चतुर्थीनिमित्त सिद्धिविनायक मंदिरात ‘श्रीं’ महापूजेचे आयोजन करण्यात येते. सिद्धिविनायक मंदिरात सायं. 7.1क् ते रात्री 9.1क् वाजेर्पयत महापूजा, नैवेद्य व आरती पार पडेल. भाविकांसाठी मंडपामध्ये मोफत चहाची व्यवस्था तसेच लाईट, फॅन, पिण्याचे पाणी याची व्यवस्था करण्यात आलेली आहे. भाविकांच्या सोयीसाठी नदरुल्ला टँक मैदानात 3, सानेगुरुजी गार्डनमध्ये 2, राऊळ मैदान ते कॉन्व्हेंट स्कूलच्या परिसरात 3 एकूण मिळून दहा टॉयलेट्स उपलब्ध करुन देण्यात आले आहेत.
अग्निप्रतिबंधक उपाययोजना करण्याच्या अनुषंगाने 8क् फायर एक्सटिंग्युशर ठेवण्यात आले आहेत. तसेच अग्निशामक दलाची एक गाडीही मंदिर परिसरात ठेवण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. भाविकांसाठी वैद्यकीय सुविधेची व्यवस्था करण्यात आलेली आहे.  कोणत्याही भाविकास शारीरिक त्रस झाल्यास त्यांच्यासाठी रुग्णवाहिकेची व्यवस्था करण्यात आली आहे. त्या रुग्णवाहिकेत सुसज्ज डॉक्टरांचे पथक तैनात करण्यात आलेले आहे.
मंदिराच्या बाहेरील परिसरात भाविकांसाठी सूचनाफलकही लावण्यात आले आहेत. त्यात मोबाईल, पर्स अशा आपल्या मौल्यवान वस्तू सांभाळा, लॅपटॉप आणि कॅमेरे आणू नये, फराळाकरिता धातूचे डबे न आणता प्लास्टिकचे डबे आणावे आणि भाविकांनी रांगेतून शांततेने दर्शन घ्यावे, अशा सूचनांचा समावेश आहे. (प्रतिनिधी)
 
अंगारकीची आख्यायिका
मंगळवारी येणारी चतुर्थी म्हणजे अंगारकी. या दिवशी अंगारक म्हणजे मंगळाचा जन्म झाला. संपूर्ण पृथ्वीवर तू अंगारक या नावाने ओळखला जाशील असा आशीर्वाद गणपतीने मंगळाला दिला. त्यामुळे अंगारकी दिवशी गणोशाचे स्मरण केले जाते, अशी आख्यायिका आहे.  
 
न्यासाचे कार्यकारी अधिकारी मंगेश शिंदे अध्यक्ष नरेंद्र राणो विश्वस्त महेश मुदलीयार हरीश सणस, प्रविण नाईक आणि नितीन कदम यांनी भाविकांसाठी अत्याधुनिक व्यवस्था केली.