Join us
Daily Top 2Weekly Top 5

राज्यात लसीकरणाचा सहा कोटीचा टप्पा पार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 3, 2021 04:06 IST

मुंबई : राज्यात बुधवारी ९ लाख ७९ हजार ५४० जणांना कोविड प्रतिबंधक लस देण्यात आली. तर आतापर्यंत राज्यात एकूण ...

मुंबई : राज्यात बुधवारी ९ लाख ७९ हजार ५४० जणांना कोविड प्रतिबंधक लस देण्यात आली. तर आतापर्यंत राज्यात एकूण ६ कोटी ७४ हजार १६९ जणांचे लसीकरण करण्यात आले आहे.

राज्यात १८ ते ४४ वयोगटातील १ कोटी ९६ लाख ९० हजार ४३० जणांनी लसीचा पहिला डोस, तर २२ लाख ८६ हजार ३३७ जणांनी लसीचा दुसरा डोस घेतला आहे. राज्यात ४५ हून अधिक वय असणाऱ्या २ कोटी ६६ लाख ८ हजार ५०० जणांनी लसीचा पहिला डोस, तर १ कोटी १५ लाख ३ हजार ८२ जणांनी लसीचा दुसरा डोस घेतला आहे.

राज्यात १२ लाख ९२ हजार ६०१ आरोग्य कर्मचाऱ्यांनी लसीचा पहिला डोस, तर १० लाख २ हजार २८१ आरोग्य कर्मचाऱ्यांनी लसीचा दुसरा डोस घेतला आहे. २१ लाख ४० हजार १४२ फ्रंटलाईन कर्मचाऱ्यांनी लसीचा पहिला डोस, तर १४ लाख ९० हजार ७९६ फ्रंटलाईन कर्मचाऱ्यांनी लसीचा दुसरा डोस घेतला आहे.