लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : अंधेरीमधील मरोळ चर्च रोडवरील खड्ड्यांबाबत वॉचडॉग फाउंडेशनचे विश्वस्त गॉडफ्रे पिमेंटा यांनी के-पूर्व विभागात नेमलेल्या अभियंत्याच्या व्हॉट्सअॅप क्रमांकावर संदेश पाठवून माहिती दिली होती. प्रशासनाने याची दखल घेत खड्डा बुजवला. परंतु आठ दिवसांच्या आत या खड्ड्याची अवस्था ‘जैसे थे’ असल्याने पालिकेने अतिशय निकृष्ट दर्जाचे साहित्य खड्डे बुजवण्यासाठी वापरल्याचे वॉचडॉगचे म्हणणे आहे.या रस्त्याच्या दुरवस्थेचे वृत्त ‘लोकमत’मध्ये प्रसिद्ध झाले होते. पिमेंटो यांनी ज्या खड्ड्याचा फोटो अभियंत्याला पाठवला होता, फक्त तोच खड्डा पालिकेच्या कंत्राटदाराने बुजवला. रस्त्यावरील इतर खड्ड्यांकडे दुर्लक्ष केले. ८ जून रोजी कंत्राटदाराने खड्डा बुजवला; १५ जूनपर्यंत त्याच ठिकाणी पुन्हा खड्डा पडला. त्यानंतर आता त्या खड्ड्यामध्ये पावसाचे पाणी साचत असल्याची माहिती पिमेंटा यांनी दिली.
खड्डे बुजविण्यासाठी निकृष्ट दर्जाचे साहित्य
By admin | Updated: June 28, 2017 03:40 IST