Join us  

सामाजिक न्याय मंत्र्यांच्या दालनात पैशावरून हाणामारी

By यदू जोशी | Published: September 12, 2018 6:07 AM

सामाजिक न्याय मंत्री राजकुमार बडोले यांच्या मंत्रालयातील कार्यालयातील एका अधिकाऱ्याने पैसे घेऊन काम केले नाही म्हणून जाब विचारण्यासाठी गेलेल्या एकाने त्या अधिका-याची सर्वांसमक्ष धुलाई केली.

मुंबई : सामाजिक न्याय मंत्री राजकुमार बडोले यांच्या मंत्रालयातील कार्यालयातील एका अधिकाऱ्याने पैसे घेऊन काम केले नाही म्हणून जाब विचारण्यासाठी गेलेल्या एकाने त्या अधिका-याची सर्वांसमक्ष धुलाई केली.मंत्रालयाच्या तिसºया माळ्यावर बडोले यांचे कार्यालय आहे. त्यांच्या दालनाशेजारील कक्षात पीए, पीएस, अधिकारी, कर्मचारी बसतात. उस्मानाबादहून आलेले अरुण निटोरे यांनी शुक्रवारी दुपारी तेथील एका अधिकाºयाला कार्यालयातच गाठले आणि प्रश्नांची सरबत्ती केली. काम करवून घेण्यासाठी पैसे दिले, इतके दिवस वाट पाहिली पण काम होत नाही, असे सांगत त्याने गदारोळ घातला.एका आश्रमशाळेची मान्यता आणि एक आश्रमशाळा अनुदानावर आणण्यासाठीची निटुरे यांची फाईल होती. यासाठी ते तीन वर्षांपासून मंत्रालयात चकरा मारत आहेत. बडोलेंच्या कार्यालयात त्यांचा वाद सुरू असताना ‘त्या’ अधिकाºयाने, मी तुझा एक पैशाचा मिंधा नाही, असे म्हणताच निटुरे यांचा संयम सुटला आणि त्यांनी अधिकाºयाच्या कानाखाली लगावल्या. पैसे घेतले अन् वरून मुजोºया करतो का, असा जाब त्यांनी विचारला.या प्रकाराने बडोले यांच्या कार्यालयात एकच धावपळ उडाली. बडोले यांचे पीए काळे, पीए फडणीस हे त्या वेळी हजर होते. त्यांनी प्रकरण मिटविण्याचा प्रयत्न केला. एवढे होऊनही बडोेले यांनी त्या अधिकाºयाविरुद्ध कुठलीही कारवाई अद्याप केलेली नाही. मात्र स्वत: निटोरे यांनी ‘लोकमत’ला ही माहिती दिली. पैसे घेऊनही काम न केल्याबद्दल माझा संताप अनावर झाल्याने मी त्या अधिकाºयाची धुलाई केली, असे त्यांनी सांगितले.>काही माणसं पैसे घेऊनही कामं करीत नाहीतबडोले साहेब चांगले आहेत, पण त्यांच्या कार्यालयातील काही माणसं पैसे घेऊनही कामं करीत नाहीत.- अरुण निटुरे, शिक्षण संस्थाचालक.