अनिकेत घमंडी ञ डोंबिवलीदिवा रेल्वे स्थानकातील रेल रोकोसह दगडफेकप्रकरणी ठाणे लोहमार्ग पोलिसांनी तब्बल १२ हजार जणांच्या जमावावर (मॉब) गुन्हे दाखल केले आहेत. प्रत्यक्षात त्यामधून दिव्यातील अवघ्या ७ जणांना अटक केली आहे. त्यामुळे लोहमार्ग पोलिसांचा तपास कूर्मगतीने सुरू असून, या ठिकाणी नेमकी कारवाई कोणी करायची? आरपीएफ (रेल्वे पोलीस दल) की लोहमार्ग पोलीस, याच बुचकळ्यात तपास यंत्रणा असल्याची टीका प्रवाशांमधून व्यक्त होत आहे.लोहमार्ग पोलिसांनी गेल्या चार दिवसांत येथून ७ जणांना ताब्यात घेण्यात आले. सोमवारी रेल्वे न्यायालयाने त्यांना ७ जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी दिल्याचे लोहमार्ग पोलीस निरीक्षक जी. थोरात यांनी सांगितले. डोंबिवलीतील नुकसानीबाबत लोहमार्ग पोलिसांनी चार जणांना अटक केली होती. त्यातील दोघे डोंबिवलीचे तर एक कर्जत, अन्य एक आंबिवलीचा असल्याची माहिती पोलीस निरीक्षक महेश बागवे यांनी दिली होती.
गुन्हे १२ हजारांवर, अटक मात्र ७ जणांनाच
By admin | Updated: January 6, 2015 01:27 IST