Join us

गुटखा विक्रीचा गुन्हा आता अजामीनपात्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 22, 2018 05:44 IST

अन्न सुरक्षा अधिकाऱ्यास गुटखा व पानमसाला विक्री प्रकरणी भारतीय दंड संहितेच्या (आयपीसी) अंतर्गत एफआयआर दाखल करण्यास प्रतिबंध नाही, असा महत्त्वपूर्ण निकाल सर्वोच्च न्यायालयाने दिला.

मुंबई : अन्न सुरक्षा अधिकाऱ्यास गुटखा व पानमसाला विक्री प्रकरणी भारतीय दंड संहितेच्या (आयपीसी) अंतर्गत एफआयआर दाखल करण्यास प्रतिबंध नाही, असा महत्त्वपूर्ण निकाल सर्वोच्च न्यायालयाने दिला. त्यामुळे आता गुटखा, पानमसाला विक्रेत्यांवर अधिक कठोर कारवाई होणार आहे.आरोपीविरुद्ध आयपीसी व अन्न सुरक्षा कायद्याअंतर्गत दोन गुन्हे दाखल करण्यास प्रतिबंध नसल्याचे स्पष्ट केलेले आहे. महाराष्ट्र शासनाने गुटखा विक्रीचा गुन्हा अजामीनपात्र व दलखलपात्र करण्याचा निर्णय घेतल्यामुळे गुटखा बंदीची प्रभावी अंमलबजावणी होणार असून गुटखा विक्रेत्यांना गुटखा विक्रीप्रकरणी तात्काळ अटक होणार आहे तसेच सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाच्या अनुषंगे गुटखाबंदीची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी अधिकाºयांसाठी मार्गदर्शक तत्त्वे तयार करणार असल्याचे गिरीश बापट यांनी सांगितले.