Join us

शहिदांचा अपमान करणा-या ओम पुरींविरोधात देशद्रोहाचा गुन्हा

By admin | Updated: October 5, 2016 12:58 IST

शहीद जवानांचा अपमान केल्याप्रकरणी अभिनेते ओम पुरी यांच्या विरोधात देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ऑनलाइन लोकमत

मुंबई, दि. 5 - शहीद जवानांचा अपमान केल्याप्रकरणी अभिनेते ओम पुरी यांच्या विरोधात देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुंबई, आग्रा आणि लखनौमध्ये ओम पुरींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. उरी दहशतवादी हल्ल्यात भारतीय जवान शहीद झाले असताना त्यावर संताप व्यक्त करण्याऐवजी त्यांना सैन्यात जायला आम्ही सांगितलं होतं का ? त्यांना शस्त्र उचलण्यास कोणी सांगितलं ? असे वादग्रस्त विधान ओम पुरी यांनी केले होते. 
आणखी बातम्या
सैन्यात जायला आम्ही सांगितलं होतं का ? ओम पुरींकडून शहिदांचा अपमान
 
तसेच पाकिस्तानी कलाकार भारतात येतात, ते व्हिसा घेऊन येतात, बेकायदेशीरपणे येत नाहीत. असे सांगत पाकिस्तानी कलाकारांचे समर्थन देखील केले होते. या वादग्रस्त वक्तव्यावरुन त्यांच्या चौफर टीका देखील करण्यात आली.