Join us

पेट्रोल कमी दिल्याने गुन्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 1, 2017 03:05 IST

पश्चिमेतील ‘डी मार्ट’समोर असलेल्या पेट्रोलपंपावर चार लीटर कमी पेट्रोल दिल्याप्रकरणी ग्राहकाने बाजारपेठ पोलीस ठाण्यात धाव घेतली आहे.

कल्याण : पश्चिमेतील ‘डी मार्ट’समोर असलेल्या पेट्रोलपंपावर चार लीटर कमी पेट्रोल दिल्याप्रकरणी ग्राहकाने बाजारपेठ पोलीस ठाण्यात धाव घेतली आहे. पोलिसांनी तक्रारीच्या आधारे पेट्रोलपंपावरील कर्मचारी पंकज शर्मा याच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी पंपाचा मालक समोर आलेला नाही.पश्चिमेतील संतोषीमाता रोडवरील इमारतीत अजित ओसवाल राहतात. ते ‘डी मार्ट’समोरील पेट्रोलपंपावर पेट्रोल भरण्यासाठी गेले होते. त्यांनी पेट्रोलपंपावरील कर्मचाºयास एक हजार रुपयांचे पेट्रोल भर, असे सांगितले. कर्मचाºयाने ओसवाल यांच्या गाडीत एक हजार रुपयांचे १३.५ लीटर पेट्रोल न भरता चार लीटर कमी म्हणजे ९.५ लीटर पेट्रोल भरले. हा प्रकार ओसवाल यांच्या लक्षात आला. याप्रकरणी त्यांनी बाजारपेठ पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्याआधारे पंपावरील कर्मचारी शर्माविरोधात गुन्हा दाखल केला.ओसवाल यांची फसवणूक झाली, त्याच वेळी पंपावर अनेक ग्राहकांना कमी पेट्रोल दिल्याची ओरड अन्य ग्राहकांनी केली होती. मात्र, पंपावरील कर्मचाºयांनी ग्राहकांच्या हातापाया जोडून तक्रार करू नका. पेट्रोलमध्ये कट मारणाºया कर्मचाºयाला समज दिली जाईल, असे आश्वासन दिले होते. पंपावरील कर्मचारी इलेक्ट्रॉनिक्स रीडिंगचा आकडा शून्य न करताच पेट्रोल भरण्यास सुरू करत होता. त्यावरून ते ग्राहकाला पूर्ण रकमेचे पेट्रोल देत नाहीत. कट मारतात. ग्राहकांची फसवणूक करतात. हा प्रकार एका ग्राहकाबाबतीत होत नसून अन्य ग्राहकांच्या बाबतीतही होत आहे. अन्य ग्राहकांनी नुकसान सहन करत गप्प राहणे पसंत केले असले, तरी ओसवाल यांनी धाडस दाखवत तक्रार दिली आहे.ओसवाल यांच्या मते पंपमालकाच्या विरोधात गुन्हा दाखल होऊन त्याच्याविरोधात कठोर कारवाई केली पाहिजे. हा पेट्रोलपंप गेल्या किती दिवसांपासून ग्राहकांची फसवणूक करत आहे, त्याने रीडिंगमध्ये काय हेराफेरी केली आहे का, याची तपासणी आवश्यक आहे.